Tuesday, September 22, 2015

स्वैराचार


स्वैराचार


स्वैराचार किंवा स्वैराचारी व्याख्या काय आहे ? भारतीय स्वराचार्याची व्याख्या संकुचित आहे तसेच संस्कृती ह्या विषयाकडे बघण्याचा दृष्टीकोन खूपच मर्यादित आहे . उदारणार्थ अमेरिकेच्या घटने मध्ये कुटुंब नियोजनासाठी साधने वापरण्यावर बंदी होती १९३८ साली त्यावरील निर्बंध कायद्याने काढल्या गेला.

आधी स्त्रियांनी कुटुंब नियोजनाची पहेल केली. मग हळूहळू पुरुष तयार झाले संपूर्ण देश सज्ञान झाला . त्या उलट भारत कुटुंब नियोजनाची साधने स्वातंत्र्य पूर्व काळापासून अस्तित्वात होते .जेव्हा स्वातंत्र्य मिळाले तेव्हा आपली लोकसंख्या ३५० मिलियन होती आज एक बिलियन १९५० मध्ये एक स्त्रीला साधारण सहा मुले व्हायची. भारत सरकारने बरयाच योजना राबल्या थोडे बहुत यश मिळाले . आपण बदलाव लवकर स्वीकारत नाही कुठलेही ज्ञान लोकां पर्यंत पोहचत नाही पोहचले तरी विरोध असतो असे प्रत्येक बाबतीत आहे . २१००० पर्यंत आपली लोकसंख्या २ बिलियन होणार आहे असा तज्ञांचा अंदाज आहे  .

तसेच संस्कृती आपली चांगली दुसऱ्यांची वाईट असे गृहीत धरले आहे . आपल्या देशाची वेशभूषा चांगली दुसर्यांची वाईट . त्यांच्या कपड्याने स्वैराचार वाढतो . प्रश्न आहे १९व्य शतकांच्य आधी बलात्कार झाले कधीच . बौध्द भिक्षुणीवर हि बलात्कार झाले . आज ज्यांना संत म्हणतो त्याही स्त्रियांवर झाले . त्या स्कर्ट किंवा शोर्ट नव्हत्या घालत . केशवपन झालेल्या विधवांनाही मुले व्हायची म्हणजे ह्या समजात वाईट गोष्टी घडल्या नाही हे नाकारता येणार नाही . दुसर्या देशातल्या स्त्रिया जे कपडे घालतात त्याने त्या स्वैराचारी ठरतात का ? भारतातल्या आदिवासी स्त्रिया ,पुरुष आजही अर्ध नग्न राहत . आपण त्यांना आपल्या मध्ये घेऊ शकलो नाही . पण त्यांच्या गरिबी मुळे त्यांचे शोषण होते ह्यावर उपाय नाही केल्या गेला . आपला योगसाधना व इतर सांस्कृतिक गोष्टी जगभर पोहचल्या ह्याच अर्थ दुसर्या देशातले नागरिक सज्ञान आहेत दुसर्या देशाच्या संस्कृतीतील काय घ्यायचे . पण आपण काय घ्यायचे हेच नाही कळले .

सौदी अरेबियात जी स्त्री इस्लाम पाळत नाही तिला वेश्या समजतात म्हणजे इतर देश जे त्यांचा धर्म पाळत नाही त्या स्त्रिया वेश्या झाल्या . म्हणजे पाश्चात्य देशात वेशभूषा वेगळी आहे म्हणू त्या सर्व देशातील स्त्रिया वेश्या आहे का ?? आपल्या देशात लग्न झालेली स्त्री पुरुष लग्न बाह्य संबंध ठेवतात जे की पाश्चात्य देशात सुध्दा चालत नाही तर त्यातही हे पुरुषांनी केले त्यांना दोष नाही दिल्या जात पण स्त्रीने केले की व्यभिचार होतो. अशी कशो संकुचित संस्कृतीची व्याख्या आपण तयार केली आहे ?तीही फक्त पुरुषांच्या सोयीने आणि फायद्याने ?मला बर्याच भारतात राहणाऱ्या स्त्रिया सांगतात त्या नारी आंदोलनचे ग्रुप आहे किंवा स्त्री मुक्तीचे विषय बोलतात अहो आपण १९व्य शतकापासून बोलत आलो आहोत पण आचरणात नाही आणत तीस टक्के सुधारले ज्या स्त्रिया नौकरी करतात असे म्हणू शकतो पण व्यक्ती स्वातंत्र्य आहे काय ? जर फेसबुक वर साधी पुरुषाने छेडल्याची पोस्ट टाकली की ती चारीत्रहीन झाली . आजवर एकही स्त्रीने तिला इंबोस्क मध्ये त्रास देणाऱ्या पुरुषावर केस टाकली नाही . मला कारणे सांगतात माझा सुखी संसार आहे म्हणजे . ह्या सामजातला पुरुष किंवा बाप ,नवरा,भाऊ सातत्याने घरातील व बाहेरील स्त्रियांवर आरोप लावतात कि त्यांची चूक आहे स्त्री वासनेला प्रवृत्त करते . पण कामुक होणार्या किंवा नराधमांना इथे दोष दिल्या जात . हि आपल्या लोकांची मानसिक किंवा बौधिक  अक्षमता आहे की जे स्त्रीचे असणे व मनुष्य काम/वासना मुळातच अमान्य करते . स्त्रीने काही करणे पुढची गोष्ट आहे . त्यामुळे ह्या स्त्रियांची चळवळ पोकळ ठरते कारण त्या स्वतःला सामजिक दृष्टीकोनातून बघतात त्यामुळे काहीही घडले की स्त्री स्वतःला दोषी ठरवे आणि समाजही . पण पुरुषाच्या मानसिक विकृती आणि स्वैराचावर झाकण घातल्या जाते . कारण संकुचीत बुरसटल्या धार्मिक चशम्यातून जग बघतात आपल्या देश्यात . अमेरिकेत साडी घातली तरीही लोक बघतही नाही आणि नावही ठेवत नाही किंवा अशी भीती नाही बाळगत कि त्यांची संस्कृती खराब होईल . पण आपल्या देशात नासुकाल्या गोष्टीनी संस्कृती खराब होते . येव्हाडी कमकुवत आहे का तुमची संस्कृती ?ती विचारांनी मजबूत असावी लागते त्यासाठी माणसांना माणूस्कीने वागवावे लागते मग टिकते पण कालमानाने बदल घडवावा लागतो संस्कृती बदलाचा विषय आहे . झाडाच्या रंग सारखा हिरवाच नसावा .

आभार

***शब्द शृंगार

    २२-९-१५