नैसर्गिक
समुद्राच्या पाण्यावर येणारी लाट माहित असत ती किनाऱ्यावर आपटून परत त्याच्यातच मिसळणार आहे.आपल्याला माहित असत. आज पूर्णिमा आहे चंद्र पूर्ण दिसतो पण अमावस्येच्या त्या रात्री तो दिसणार नाही हे कशे नैसर्गिक सृष्टीचे नियम आपण मान्य केलेच आहे. तसेच आपल जीवन आहे. आज दिवस चांगला गेला पण उद्या तो चागला असणार हे नक्की नाही. ते आपल्यालाही माहिती असत. पण मनुष्य स्वभावाच असा असतो की त्याला ज्यात आनंद वाटतो तेच त्याला आवड नाही तर नआवडणार्या गोष्टीच त्याला दुख वाटत. ह्या सृष्टीवर जे जीवित अजीवीत आहे ते येणाऱ्या प्रत्येक सुख दुखाला समोर जाते .सुनामी यायच्या आधी पक्षी उडून गेले होते त्यांना येणाऱ्या आपत्तीची चाहूल लागली होती. पण झाडांना हे शक्य नाही आपणही निसर्गाचाच भाग आहोत पण आपल्या बुध्दिमातेवर आपण खूप प्रगती केली भौतिक सुखाचे जग तयार केले. आपल्याला ते खूप प्रिय आहे.त्यामुळे मनुष्य स्वतःला या सृष्टीपासून जरा का होईना पण मोठा आणि वेगळा समजतो. आपण मनुष्य सगळ्या प्राण्यांपेक्षा स्वतःस वेगळे समजतो. त्यामुळे जे जीवनात अडथळे येतात आपण त्यांचा तिरस्कार करतो हे भौतिक जग आपणच तयार केले आहे हेच नेमक विसरतो हे वेगवेगळ्या क्षमता असलेल्या मनुष्यानसाठीच आपण तयार केले आहे. हा मुद्दा जर लक्ष्यात घेतला तर जीवन एकदम सोप होत. दुसऱ्याचे यश व आपले अपयश हे नगण्य होते. त्यात कोणी हुशार किंवा मूर्ख ठरत नाही. प्रत्येक व्यक्ती वेगळ्या वातावरणात वाढलेली असते त्यामुळे प्रत्येकाचे यश अपयश ह्याची परिभाषा पण वेगळी असते.एखाद्या शेतकऱ्याच्या घरात मुल दहावी पास झाले म्हणजे त्यांना ते मुल यशस्वी वाटते आणि एका उच्च शिक्षित घरात मुलाचे ऐंशी टक्के गुण पण कमी समजल्या जातात. यश अपयश हा आपल्या बघण्याचा दृष्टीकोन आहे. त्यापेक्षा आपण आहो त्या परिस्थितीची जाणीव ठेवली तर काल आपण काय होतो आणि आज किती प्रगती केली त्याबरोबरच विचार किती प्रगत झाले, आपण किती नाती नवी जोडली, किती वर्षांपासून प्रेमळ संबंध टिकवले पुढील जीवनात अजून आपण काय प्रगती करायची ह्याचा विचार केला तर जीवन सहज होत. स्वतः मध्ये प्रगत होण्यासाठी चढाओढ करायची दुसऱ्याच्या पुढे जाण्यासाठी नाही, त्याने आपल्या जीवनातला आनंद हिरावल्या जातो. आपल्या मध्ये असलेल्या कला गुणांना जोपासा अगदी मरेपर्यंत तेच तुम्हाला आंनद देतात.
धन्यवाद
शब्द शृंगार
धन्यवाद
शब्द शृंगार
copyright©Laxmi Desai

आयुष्यात चिरकाल टिकनारा सकारात्मक आनंद किती मिळवला याला महत्त्व आहे.
ReplyDeleteसुंदर लेखन.