थांबव म्हणाली होती खूप आधी
उशीर झाला तुला समजायला कदाचित
हट्टाने तुझ्या घडत गेले अघटीत
पश्चातापात झुरणे असेल तुझ्या नशिबी कदाचित
***शब्द शृंगार
१२. ८. १४
खूप उशीर नाही झाला आता विचार करायाल
आवर घातला असता तेव्हा भावनांना जरासा
वेळच नसती आली चिंता करण्याची पण शपथ ऐकशील
जाणीव झाली आज तुला इतक्या दिवसांनी
***शब्द शृंगार
१२. ८. १४
शपथ आहे तुला जर तू माझे ऐकशील
यश आहे तुझ्या पदरात त्याचा विचार करशील
अर्धांगिनीचा वाटा गावभर वाटशील
तिच्या पुढ्यात उष्ट्या पत्रावळ्या वाढशील
किती जणींना अजून सती देशील
अश्रुनच्या प्रलयात जेव्हा बुडशील
त्या दिवशी तू भानावर येशील
***शब्द शृंगार
१२. ८. १४
काय दोष आहे त्या सावित्रीचा
तुझ्या पायात भिंगरी तू फिरतो गावागावात
आयुष्य गेले तिचे तुझी ब्याग भरण्यात
रिकामी करून मळके कपडे धुण्यात
डोळे थकले तिचे तुझी वाट बघण्यात
तू विश्वासघात करतो बसून तिच्या पुढ्यात
माझे पावित्र्य लोळवशील तुझ्या गटारात
***शब्द शृंगार
१२. ८. १४
सगळेच नसतात करत देवाणघेवाण
सगळेच नसतात विकायला भावनांच्या बाजार
काही असतात जीव गेला तरी इमान राखणारी जमात
चांगली माणसे असतात खरच अस्तित्वात या जगात
***शब्द शृंगार
१२. ८. १४
सगळेच नसतात करत देवाणघेवाण
सगळेच नसतात विकायला भावनांच्या बाजार
काही असतात जीव गेला तरी इमान राखणारी जमात
चांगली माणसे असतात खरच अस्तित्वात या जगात
***शब्द शृंगार
१२. ८. १४