का सोसले सारे कशासाठी
कोण तू कुठला अनोळखी
का ओढा मनी तुझ्यासाठी
तुलाही वाटते का असे माझ्यासाठी
नको देऊ मज आस खोटी
***शब्द शृंगार
१२. ७. १४
आसरा नाही मागत तुझ्या जवळ
फक्त चाल काही पाऊले माझ्या सोबत
मीही राहीन सावली सारखी तुझ्या सोबत
तुला जाणवणार नाही तू उभा आहेस तुझ्या डोहां देखत
***शब्द शृंगार
१२. ७. १४
आठवते तुला डोके ठेवून रडले होते तुझ्या खांद्यावर
तुही डोक्यावर हात फिरवून म्हाणाला होतास सांभाळ
ताबा मिळव स्वतःवर वाटले होते सोबत राहशील
आयुष्यभर पाठ का फिरवलीस इतक्या लवकर
***शब्द शृंगार
१२. ७. १४
नको खेळ खेळू तुझ्या अहंकार पोटी
नको मज आस दाउ जर तुझी प्रीत खोटी
मी सरळ साधी पोर नको लाऊ माझ्या जीवास घोर
जीव जातो माझा आधि भीतीपोटी
आधिच आहेत माझ्यात खूप त्रुटी
स्वार्थापाई
माझे आयुष्य लाऊ नकोस कसोटी
***शब्द शृंगार
१२. ७. १४
अश्रु ढाळून थकले तुझ्यासाठी
सहन शक्ती उरली नाही माझ्यापाशी
नको त्रास देउस नाते जोडले
पुन्हा मी माझ्या वेदनेशी
आली होती खूप आशेने तुझ्यापाशी
पुन्हा भेट घालून दिलीस नव्या दुःखाशी
***शब्द शृंगार
१२. ७. १४
दोष तुझा होता जो तू मज शोधत होता
की नजर माझी जशी तुझा भेद घेत होती
वेदना माझी वांझोटी जसे कारण नवे शोधत होती
की दोघेही होती दुटप्पी एकमेका फसवत होती
की दोन काळीज एकमेकात प्रेमापोटी गुंतत होती
सारी उत्तरे तुझ्या काळजात दडून होती
***शब्द शृंगार
१२. ७. १४
की नजर माझी जशी तुझा भेद घेत होती
वेदना माझी वांझोटी जसे कारण नवे शोधत होती
की दोघेही होती दुटप्पी एकमेका फसवत होती
की दोन काळीज एकमेकात प्रेमापोटी गुंतत होती
सारी उत्तरे तुझ्या काळजात दडून होती
***शब्द शृंगार
१२. ७. १४
वैर होते जन्मल्या जातीशी
अस्पुश्या जरी तू वाटे मज बसावे तुझ्यापाशी
झगडले आयुष्यभर ज्याच्यासाठी
पाठ फिरवून गेला जरी होती मी हवी हवीशी
*** शब्द शृंगार
१२. ७. १४
ओठी हसू उमलवून गेला काही क्षणांनसाठी
जाणिवांना जागवून आस दिली सोबतीची
हलकेच स्पर्शून गेला स्पंदने काळजाची
हवी हवी मज वाटे उब तुझ्या श्वासांची
सवय तुझ्या आठवणींना इथेच रेंगाळयची
***शब्द शृंगार
१२. ८. १४
एका चुकीची शिक्षा देऊ नकोस इतकी मोठी
की आयुष्य उद्धवस्त होउन
श्वासही थांबतील माझे भीतीपोटी
जन्म घेऊन दिली आधिच खूप मोठी कसोटी
एका चुकीची शिक्षा देऊ नकोस इतकी मोठी
की आयुष्य उद्धवस्त होउन
श्वासही थांबतील माझे भीतीपोटी
जन्म घेऊन दिली आधिच खूप मोठी कसोटी
***शब्द शृंगार
१२. ७. १४
No comments:
Post a Comment