Sunday, November 9, 2014

मध्यांक



मध्यांक

चूक आणि बरोबर मधेही काही वसते. शुन्य आणि एकाच्या मधेही असतात आकडे. नैतिक अनैतिकतेच्या अतिरिक्त असतात मुलये. ह्या धरेच्या आणि निळ्या अंबरा पलीकडे. दूर ताऱ्यांच्या देशी चांदण्यांची रांगोळी हलकेच पाऊल पुढे टाकत चालात जायचे त्या ओळी. निशब्द निशांत धुसर नंतर काळोखी. अदृश्य होतात हळूच चांदणेही. मग अंधाऱ्या त्या दरीत भिराभिरीत अडखळत शोधायच्या आधारासाठी भिंती. हरवलो वाट आपली त्याच दिवशी  ठरवली चालायची वाट अनोळखी.आवाज पोहचत नाही कुणाच्या कानी एकल्यावरही  साद देत नाही कुणी. ती तळमळ ती घुसमट वेदना सारे काही आसवेही पत्करतात शरणागती. धोधो वाहून  पूर जरी आला आपणच गुदमरणार डुंबून त्यात . तरी मनाचा आवेग सैरावैरा धावे. त्या कसे बंदिस्त करावे. त्याला लागता पुरावे. सहनही होत नाही दुरावे. पण त्याला लागते फक्त झुरावे. त्या जगी स्वाभिमान , मान सन्मान , अभिमान ह्याचे जरसुद्धा नाही अस्तित्व . ह्याची सारी दुसऱ्यावर भिस्त . इथे अंधारात अंधार मिसळलेला . इथे काळीज एक जरी दोन भिन्न विश्व. इच्छा एकाच . अपेक्षा शुन्य . हाच तो शून्य आणि एक मधला मध्यांक. करतो साऱ्यांनाच अचंब.
हे फक्त मनाची द्वंद्व. हेच नात्याचे ह्या विशिष्ट हे अद्रुष्य . ह्याचे समाजात अस्तित्व शुन्य. पण तरीही जिवंत हे द्वंद्व. कारण समाज प्रथाच्या बेड्यात. मनुष्य नात्यांच्या त्या विळख्यात . जखडून गुदमरून रमतो स्वप्नात , अद्रुष्य अश्या जगात . जे गुपित दडले फक्त त्याच्या मनात. जे शिवलेही नाही शब्दांनी त्याच्या ओठास .
असहनीय करून संकल्प ,जपलेली ती आकांक्षा निघतो तो पूर्ती करण्यास. शोधतो त्याची हरवलेली मनीषा दुसऱ्याच्या मनात . सतत करतो प्रवास भेद घेतो दुसऱ्याच्या काळजात . शिकारी निघतो भक्ष् शोधण्यास . असतो तरबेज करतो नजर कैद निशाणही त्याचा अभेद. घेतो हरिणीच्या काळजाचा वेध . तीक्ष्ण बाणाने घायाळ ती हरिणी . संपले तिथे नवा शोध नवे भक्ष्य. एखाद वेळेला चुकतो त्याचा निशाणा भेद घेतो वाघिणीचा मग काय सारेच उलटे , सारे गणितच चुकते . आक्रोश तिचा फोडतो डरकाळी , हलवते ती त्याचे अस्तित्व करते ढळमळीत. निशब्द उघडेल का कनात भीती मनात . दृष्टीस येईल मध्यांक . गुपित ते दडलेले द्वंद्व . तुटते ते धैर्य . कोसळतो तो अहंकार . समजतो त्याचा विकार पण करत नाही स्वीकार .
आभार
*** शब्द शृंगार
११. ७. १४

No comments:

Post a Comment