Sunday, November 9, 2014

तृष्णा



तृष्णा

तूच पेटवला आहे तुझ्या आयुष्याचा वणवा. लाथ मारून निघाला भरलेल्या बावडीला. तूच ठरवले होते तुला जायचे प्रवासाला. रस्ता हरवला पोहचला ओसाड वाळवंटाला. वणवण फिरतो पण सापडत नाही तुला तुझी वाट . रखरखत्या उन्हात अन दरदरुन घामात. वाट पाहतो कधी रात्र होईल उन्हातून या कधी सुटका होईल. रात्र झाली भयाण अंधार एकटाच तो बोचणारा गारठा अन  वाळू थंडगार भुकेला तहानलेला तू थकून विसावतो घेतो स्वप्नानाचा आधार. रोज नवे स्वप्न अभिलाषा  कधी होतील साकार पण सारराच अंधकार अन तू लाचार . पुन्हा सकाळ तू परत पाण्याच्या शोधत. निवडूंगाचा घेतो आधार पण तोही तीक्ष्ण काटेरी बोचाणारच ना त्याला धरायचे म्हटले तर तीक्ष्ण काट्यांनी जखमा होणारच ना ,रक्त सांडनारच ना.अन तीव्र वेदना होणारच ना . दबलेला हुंदका आक्रोश करणारच ना .सोशिकता संपली संयमही सुटत चाललाय.  तरी तुझी तृष्णा भागातच नाही ना. तुझा मृगजळाचा शोध संपतच नाही ना . तू विसावाया देतोस नकार . भ्रमण करून तुला आता झालेत विकार. त्या घराच्या बावडीला तुझाच आधार. पण तू कुठे केलास तिचा स्वीकार. म्हणूनच आले आयुष्य हे अश्वथम्याचे अजरामर ते. जरजरल्या  भळभळणाऱ्या जखमांचे. तरी हेका तुझा करतो तुला पुन्हा लाचार.तुझा अहंकार तु करशील हे वाळवंट झंझावात पार. दिसतोस तुही थकला हरलेला फार. उरला कुठे आहे तुझ्यातही त्राण. हेका तुझा घेईल एक दिवस तुझा प्राण.
    सारे आहे तुझ्याच हातात तूच दिली होती कौरवांची साथ. तूच सोडला होता सत्याचा साथ. तूच अडकलास चक्र्व्युव्हात. तोड सारे पाश तुलाही सापडेल. आयुष्याचे पर्व. तुही गाठशील माणसाचा आंतरिक उचांक. तुही फुकशील माणुसकीचा शंख. तुही होशिल कुणाच्या आकाशी  शशांक (चंद्र देव ).

आभार
शब्द शृंगार
११. ६. १४

No comments:

Post a Comment