Sunday, November 9, 2014

दाब



दाब

काल मला एक माणसाने मेसेज केला . तो माझ्या प्रेमात आहे म्हणे. मी कधीही त्या व्यक्तीशी चाट पण नाही केली. ह्या वयात अश्या गोष्टीनचा राग येत नाही. दुःख वाटते. ते हे या देशात व समाज पद्धतीने मानसिक विकृतींना जन्म दिला. इथे माणसाच्या साध्या साध्या गोष्टींचा वाउ केल्या जातो लहान पणा पासून ते थेट मरेपर्यंत त्याला सूटच दिल्या जात नाही तो जन्मा पासून जो धर्म जात प्रथांच्या कटघर्यात उभा असतो. त्याला प्रत्येक चुकीसाठी दोषी ठरवल्या जाते. छोटीशी चूकीची सुद्धा माफी नाही . आईवडिलही कधी मनोबल वाढेल असे प्रोत्साहन नाही प्रत्येकदा दुसऱ्याशी तुलना सगळेच आईवडील असे आहेत असे नाही. पण भारतात खूप मोठ्या प्रमाणावर गरिबी आहे इथे प्रत्येकाला साधे आपल्या पायावर उठून उभे राहण्यासाठी झगडावे लागते. त्यात घरात व शाळेत आज्ञा पाळायची जसे म्हणतील तेच ऐकायचे नाही तर शिक्षा मारहाण करणार  हे लहानपण. जितकी जास्त शिक्षा लहान मुलांना होते त्यांचे मानसिक संतुलन बिघडते. काही मुले लक्ष्य केंत्रीत करू शकत नाही त्यांना  ADHD   Attention deficit/hyperactivity disorder, Dyslexia इतर  Learning Disabilities. ह्याचा शाळेत व घरात साधा विचारही केल्या जात नाही फक्त हा अभ्यास करत नाही मग काय टच टच बोलायचे, मारायचे कारण पालकही अज्ञानी आणि शिक्षकही अज्ञानी.  इथे सारेच मेरीट मध्ये आले पाहिजे हि अपेक्षा सारेच डॉक्टर इंजिनिअर झाले पाहिजे ही अपेक्षा. कोंडमारा होतो याने मनुष्याचा जरी लहान मुल असले त्याला समजात नाही असे नाही तो तुमच्य धाकाने बोलत नाही .घरात सतत बघतो आईचे ,बहिणीचे दुय्यम स्थान तेच टाकले जातत मनुवादी संस्कार. तुम्ही त्या लहान मुलांचे मानसिक संतुलन बिघडवता आहात हे सुद्धा माहित नाही या समजला .
जी मुले कठोर पालक सोबत वाढतात तेही तसेच होतात ही विकृती आहे हे पण माहित नाही आपल्याला . मग मनामध्ये तो धगधगता दाह घेऊन तारुण्य येते .
मग काय हिंसा करायची मारझोड दादागिरी . असे प्रोब्लेम असलेले मुले जास्त हिंसक होतात . मग मुलीनाही त्रास देणे आलेच कोण जपणार आशयाच्या भावना . मग काय अजूनच भर पडते . जरी काही प्रोब्लेम नसले तरीही दाब आहेच. देवत्व प्राप्त करण्याचा , आदर्श मनुष्य होणाचा जो कधी अस्तित्वात नाही .
नौकरीसाठी तेच खटाटोप. ती कशीबशी लागली नाही तर लग्नाची घाई. तो पर्यंत त्या मुलालाही हेच जीवन असते हे याच्या डोक्यात बरोबर पक्क बसते . तोही विरोध करणे सोडून देतो हत्यार टाकतो . शरण जातो या परंपरागत अन्यायाला . त्याचे जाती बाहेर प्रेम असेल तरी उजागरी नाही घरी सांगायची . मग काय आदर्श पालक अन आदर्श पुत्र करतात  जिच्याशी  गाठ बांधतील  तिच्याशी लग्न पुन्हा तेच हे नवे जोडपे समजाच्या कटघार्यात सुरु तेच चक्र . कारण घटस्पोटला आजही तितकीशी मान्यता एकपत्नीव्रत जगणे आजही प्रतिष्ठा मानल्या जाते .  पण जी स्वप्नांची झालेली राख रांगोळी कशी बसेल चूप तो धगधगता लाव्हा किती दिवस नाही होणार त्याचा उद्रेक. मग काय दिसेल ती स्त्रीची काढायची छेड, गैर संबंध ठेवायचे . कारण तो वाढतांना कुणी नव्हता केला त्याच्या भावनेचा विचार कोणी नव्हते दाखवले सदाचार , कोणी नव्हता केला नैतिकतेचा विचार , व्यभिचाराच ठरला सदाचार. आपणच केलाय हा परंपरांच्या नावाचा प्रेशरकुकर आपणच वाढले हे दाब. आपण केले बंदिस्त आपले विचार धर्म , जात अडकलो आहे त्या बेड्यात. त्यामुळे गुन्ह्ये गांभीर्याने घेत नाही हेच कारण आहे . आजही कायदा असूनही वापर होत नाही . इथे आदर्श काय असावे ह्यातच घोटाळा आहे . जिथे पदोपदी प्रत्येक जण प्रत्येकाची मर्यादा ओलांडत असतो तिथे काय अपेक्षा करायची.  स्त्री तर शतकांपासून बळी पडते पुरुषांच्या वासनेला. सगळ्या जगातच तसे आहे . पुरुष आपला त्रागा स्त्रियांवरच काढतात . आजच्या भारतीय स्त्रीयांना सुजाण होणे आवश्यक आहे. त्याच ह्या समजतील स्त्री पुरुषांना घडवतात. येणारी पिढी अशी घडावा , असा समजा साकार करा जेथे स्त्रीला तिच्या अधिकारासाठी झगडावेच लागणार नाही . दुसरे सरकारने महानगरपालिकेच्या शाळांमध्ये सुधार केला पाहिजे. अठरा वर्ष्यापर्यंत शिक्षण बंधकारक ठेवले पाहिजे .

आभार
लक्ष्मी देसाई
११. ९.  १४ 

No comments:

Post a Comment