Friday, October 31, 2014

अग्रेसर भारतीय पुरुष व स्त्री अत्याचार

अग्रेसर भारतीय पुरुष व स्त्री अत्याचार
पुरातन भारतापासून विद्यापीठे आहेत . ब्राम्हण , क्षत्रिय आणि वैश्य या तीन वर्णतील लोक सातत्याने शिक्षण घेत आहे आहेत. जरी आजच्या प्रमाणे नाही तरी काळाप्रमाणे वेद भाषा ,लक्षकरी , आयुर्वेद  इतर शिक्षण घेत आले आहेत तसे पुरावे आहेत तक्षशीला नालंदा आणि अनेक वेगवेगळ्या काळात विद्यापिठे होती . फक्त श्रुद्र आणि स्त्रिया शिक्षणापासून वंचित होत्या. तरी बघितले तर मोठ्याप्रमाणावर वरील तीन वर्ण जरी धरले तरी सुशीक्षिततेचे प्रमाण बरेच होते. तसे जर बघितले तर स्त्रिया आणि क्षुद्रांना १९व्या शतक पासून शिक्षण मिळण्यास सुरवात झाली.  इतर तीन वर्णातील पुरुष (ब्राम्हण , क्षत्रिय आणि वैश्य )  क्षुद्र आणि स्त्रियांपेक्षा खूप आधीपासून शिक्षण मिळत गेले. त्यामुळे मला असे वाटते ते शिक्षणात अग्रेसर आहे. तरीही आजच्या भारतात जातीभेद आणि स्त्रियांवरील अत्याचार थांबले नाही. का बरे ? आज स्त्रिया उच्चशिक्षित आहेत वेगवेगळ्या क्षेत्रात उच्च पदाधिकारी आहेत. पंतप्रधान , राष्ट्रपती , परराष्ट्र मंत्री त्याबरोबरच वैज्ञानि क्षेत्रात आज तर मंगळावर यान पाठवण्यापर्यंत ते हिमालयाचा उच्चांक गाठला तरीही सत्तर टक्के पुरुषांची स्त्रीकडे बघण्याची नजर बदललेली नाही. १९१३ साली गिरिजाबाई केळंकरांनी एक नाटक लिहिले होते "पुरुषांचे बंद " हे नाटक लिंगभेदावर आधारित आहे थोडक्यात सांगते "कुठेतरी भारतात एका राज्यात साधू सिंग नावाच राजा असतो त्याच्यावर एका  विकारानंद नावच्या साधूचा खूप प्रभाव असतो तो राज्यातील पुरुष नागरिकांना सांगतो की तुम्ही तुमच्या स्त्रियांना घराबाहेर काढा नाही तर तुम्हाला कुठलेच काम करता येणार नाही .  सर्व स्त्रियांना बाहेर काढतो व त्यांच्यासाठी दुसरे फक्त स्त्रियांचे राज्य जेथे राणी ,सैनिक वैद्य असे सारे काम स्त्रियाच करतील  राज्य त्याच चालवतील असा आदेश देतो. राजा साधू सिंग विकारानंदाचे असे करण्यामागे कारण सांगत नाही जे की असे असते "स्त्री म्हणजे पुरुषासाठी नरकाचे दार उघडते ती त्याला आपल्या पाशात असे अडकवते कि तो त्यातून कधीच बाहेर पडू शकत नाही आणि मग तो जन्म मरणाच्या चक्रात अडकतो व त्याला मुक्ती मिळत नाही . त्याप्रमाणे स्त्रीशी संबंध ठेवणे म्हणजे नागाला दुध पाजाण्यासारखे आहे ." त्यामुळे स्त्रियांशी कुणी संबंध ठेवायचे नाही . पुरुषांच्या राज्यात अतिशय वाईट अवस्था होते गुन्हेगारी वाढते , गोंधळ माजतो, सोनार , कपड्याचे व्यापारी , त्यावर कारागिरी करणारे सार्यांचे धंदे बसतात . त्याबरोबर पुरुषांना बाहेर आणि घरात येउनही काम करायचे स्वैपाक , मुले सांभाळणे व इतर घरातील कामे . त्या उलट स्त्रियांच्या राज्यात त्या सुरळीत चालवतात दवाखाने व इतर सर्व कामे निट पार पडतात.ह्यामागे त्या काळातील गरजे प्रमाणे एक उद्देश होता स्त्रिया काम करून जे पैसे मिळवतात त्यांना पुरुषांसारखाच त्यांच्या पैशावर अधिकार आहे व त्या पुरुषांसारखीच कार्यक्षमता असते त्यामुळे पुरुष स्त्रियां जी दुय्यम वागणूक व त्यांचारवर जे अत्याचार करतात ते अयोग्य आहे नंतर सरस्वतीबाई त्या ढोंगी विराकनंदा बरोबर वादात जिंकते व त्याचे पितळ उघडे पडते की तो तिचा नवरा आहे तो ब्रम्हचारी नाही व त्याच्या स्त्रियांबाबतच्या चुकीच्या ज्ञानामुळे त्याने तिला व तिच्या मुलाला टाकून दिले . मग राजा माफी मागतो वगैरे …
          वरील माहितीनुसार असे सिद्ध होते की दोन्हीही लिंग  समान आहे.१९१३ साली ह्या नाटकची गरज होती पण आजही प्रश्न तेच आहेत. स्त्रियांनी ज्या झपाट्याने प्रगती केली आहे आपण बघतोच आहे. मग तरी रस्त्याने जातांना तिची छेड काढणे शिट्या मारणे , फेसबुकवरही इंबोक्स मध्ये तिला काहीही बोलणे हे दीर्घकाळ  सुशिक्षित असलेल्या समाजाचे लक्षण आहे का ? जागतिक स्त्रियांवरील अत्याचारांच्या क्रमांकात आठव्या क्रमांकावर आहे. मला असे वाटते स्त्री शिक्षण आणि सुधारणेवर जेव्हढे कार्य झाले तितकेसे पुरुषांची मानसिकता बदलण्यावर झाले नाही काळाप्रमाणे ते तितकेसे बदलेच नाही आजही त्यांच्यावर मनूचा पगडा आहे, मला असे वाटते आज पुन्हा ज्योतिबा आणि सावित्रीबाई फुलेंचा जन्म घ्यायला हवा म्हणजे ह्या देशातील पुरुषांची मानसिकता बदलेल . कारण ते विचारांनी मागे राहिले. ज्या दिवशी बायको उच्च पदावर आहे म्हणून भारतीय पुरुष घरी बसेल मुले संभाळायसाठी त्या दिवशी सामनाता आली समजू दुसऱ्या देशांना नावे ठेवणारा आपला समाज तिथे दर पंचीवीस वर्गातील  मुलांमागे एक वडील घरी  लहान  मुले असतांना संभाळायसाठी घरी राहतात.  त्याबरोबरच ते स्त्रियां सारखीच घरातील कामे करतात . जे नौकरी करतात तेही घरात हातभार लावतात . सगळे वाईट आहेत हे म्हणण्याचा उद्देश नाही पण सत्तर टक्के मोठे प्रमाण आहे का फक्त तीस टक्केच पुरुष विचारांनी पुढारलेले व स्त्रीयांना समान हक्काने वागवता. तुमच्या ग्रंथात अबला जेही काही लिहिले आहे ते सत्य नाही. काळाप्रमाणे आपली भौतिक स्तिती बदलली पण मानसिकता नाही . एकविसाव्या शतकातील स्त्रीने आपल्या कर्तृत्वाने दाखवून दिले तरी छेडखानी , बलात्कार स्त्रीभृणाहत्या, हुंडाबळी सारखे अत्याचार आजही का होतात ? लोकल मध्ये वेगळा महिलांसाठी वेगळा डबा , शाळेत मुले मुली वेगळ्या बाकावर बसतात ह्या विषमतेनेच आजही मुलामुलींना वाढवले जाते नैतिकतेच आणि संस्कारांचा तुटवडा आहे, हीच कारणे आपले  समाजिक व वैचारिक शतक बदललेले नाही ती दिनदर्शिका शतक मागे आहे . सती नवर्याच्या सरणावर गेल्याने नाही ती वेगवेगळ्या रुपात आजही जिवंत आहे .
आभार
लक्ष्मी देसाई 
१०. ३०. १४

No comments:

Post a Comment