Saturday, October 25, 2014

निर्मळ

निर्मळ
तू रित्या भावनांचा जो खेळ आहे
उशाला मज आसवांचा मेळ आहे
शिकार काबिज काळजांची तुझा छंद आहे
तू कुणात कधी गुंतला आहे
तुला ऐश्वर्याची जी धुंद आहे
मज कशाचा कुठे गंध आहे
भावते रूप निर्मळ गंगे स्वरूप आहे
जरी गढूळ ती सांडपाण्याने
भावनेत पावित्र्य अजून जिवंत आहे
तुझे पाप धुण्यास आजही ती समर्थ आहे
***शब्द शृंगार
  १०. २५. १४

No comments:

Post a Comment