Sunday, October 19, 2014

परिवर्तन



परिवर्तन
उचलली जीभ लावली टाळ्याला
शंकराचार्याला वाटते लोकशाही
गेली तेल आणायला हेच खत घालतात जातिभेदाला

गोरगरीब चालून जाती वारीला
साल मुख्यमंत्री दर्शनसाठी रांगेत पहिला 
शेवटी पांडुरंग उपाशीच भक्तीला

साला उचला दगड फोडली बस
अबे इथ माणूस झाला जनावर 
गांधीचे फोटोला घालतो हार हेच दाखवतो संस्कार

मेहनत करून दुकान चालवणाऱ्या व्यापाऱ्याला
निघाले राजरोसपणे हप्ते वसुलीला
जन्माला आले काबे फक्त एट खाउन ठसन दाखवायला

बंद करा नशिबाला कोसुन नवस बोलणे
देवालयाचे भरले खजिने  त्याने कुणाचे प्रश्न सुटले
त्यापेक्षा शिका देशाशी इमान राखून जगणे

देशाच्या नेत्यांनी केले साऱ्यास गुलाम
कायदा मारतो त्यांना सलाम
माणुसकी होते रोज कलाम

काय फरक पडतो नरेंद्र आला का देवेंद्र आला
अबे वृत्ती नाही बदलली तर सारे प्रश्न कायम
भ्रष्टाचार मिटवण्यासाठी पाळा काही नियम

***शब्द शृंगार

No comments:

Post a Comment