स्त्रीला मसिक पाळी म्हणजे तिच्यातील एग बिजारोवान झाल्यास तो धरून ठेवण्यासाठी गर्भाशयाच्या रेशा (lining ) जरा जाड (Thick )होतात जर तो एग fertile नाही झाला तर त्या रेश्या दर महिन्याला रक्त स्त्रावा द्वारे गळून पडतात. ही प्रक्रिया अतिशय नैसर्गिक आहे स्त्रियांना ह्याची सवय असते.हिंदू धर्माशिवाय दुसऱ्या कुठल्याही धर्मात असे पाळल्या जात नाही. स्त्रियांच्या बाबतीत दसरे पश्न दुसर्या देशांमध्ये पण होते आपल्याकडे मुख्य कारण असे की शिक्षण आणि विज्ञानाचा संपर्क आपल्या देशात इंग्रज आल्यावर आला. त्यामुळे लोकांना धर्म सांगेल तेच प्रमाण होते. आता आपल्या येथे स्त्री दैवत पण आहे दुर्गा, लक्ष्मी, सरस्वती, पार्वती ह्यांना शक्ती मानल्या जाते पण त्यांना दैवत्व प्राप्त असल्यामुळे त्यांना हे नैसर्गिक नियम पण लागू होताच असतील. ह्याचा विचार केल्या जाता नाही. काही घरनमध्ये आजही वेगळे बसवले जाते, जर स्त्रियांना चार दिवस मासिक पाळीत देवळात जाता येत नाही. तर स्त्री दैवतांची चार दिवस पूजा करू नये. दुसरे नवरात्र हा देवीचा सण आहे ती स्त्री दैवत आहे मग नवरात्रात का स्त्रीच्या मासिक पाळीचा विटाळ व्हावा मी असा प्रश्न माझ्या आजीला जेव्हा विचारला तेव्हा माझ्या तोंडात थप्पड मारायचे बाकी ठेवले होते. मी त्यावेळला १३ वर्ष्याची होती .माझे एकच म्हणणे आहे ज्या उदारातून स्त्री व पुरुष दोघांचाही जन्म होतो ते अपवित्र कसे असू शकते आपण पुथ्वीला माता संबोधतो मग स्त्रीला मासिक पाळीत विटाळ का मानतो ? आपल्या विचार करायची पद्धत आजही जंगली आहे. वेद ज्या काळात लिहिले होते त्या काळानुसार ह्या प्रथा प्रचलित होत्या आज विज्ञान युगात आपल्याला माहित आहे गर्भाशय ही मानवाची जन्मभूमी आहे. स्त्रीला मातृत्वाचे वरदान आहे. मग ती अपवित्र कशी ?
धन्यवाद
शब्द शृंगार
copyright© Laxmi Desai

ह्या आपल्या विषयावर माझे एक वास्तव विमोचन आहे .. लगेचच पोस्ट करतो..
ReplyDeleteAabhar
Deleteसहमत !
ReplyDeleteAabhar
Deleteछान लिहिलेय. लक्ष्मी जी मराठी टंकलेखनाबाबत काही मदत हवी असेल तर कळवा. एक फुल फिचर्ड मराठी फ्री सॉफ्टवेअर देऊ शकेन. धन्यवाद.
ReplyDeleteAabhar
Deleteसहमत !
ReplyDelete