Monday, September 1, 2014

आपण धर्मिक रोबॉट(धर्म बॉट ) तर नाही ??????



आपण धर्मिक रोबॉट(धर्म बॉट ) तर नाही ??????
धर्म ,संस्कृती, परंपरा  जपण, हा कालांतरा नुसार कमी होत जातो जगामध्ये असेच घडत आले पण आपल्या पूर्वे कडील जेथे हिंदू व इस्लाम पाळल्या जातो तेथे परंपरा आजही ज
श्याच्या तश्या टिकाव धरून आहे.  छोट्यामोठ्या प्रमाणात का होईना पण त्या समाजात लोकांना जखडण्याची ताकत ठेवतात. त्याची बरीच करणे आहे काही सांगते. सामजिक जीवन पद्धतीत विज्ञान विषय विचारात कधीच घेतल्या जात नाही .
आपण भारतीय लोक मुले वाढवताना समाज नावाच्या राक्षसाची भीती घालवून वाढवतो.
ह्या धर्म परंपराच्या नावावर एक मोठ्यांचा आदर करण्याच्या नावावर आज्ञाधारी बनवतो .आदर करणे शिकवावे पण मन मारायला शिकवू नये. 
जेव्हा कुठलाही व्यक्ती आज्ञाधारक होतो तो आपली बुद्धी वापरणे बंद करतो
प्रत्येकाला एकच धर्म ,परंपरांच्या साच्यात बसवतो.
आपल्या येथील मुल धर्म परंपरांचा चष्मा लावून जग बघत असते. 
मग त्यात शारीरिक, मानसिक  छळ करणे हा भाग आहे.त्याचे कुणाला वावगे पण वाटत नाही.
जेथे जिज्ञासा मेली मनुष्याच्या जगण्यास अर्थ उरत नाही. मग जगायचे ते प्रोग्राम केलेल्या रोबोट सारखे
ते हेच कारण आहे की आजवर भारतीय स्त्री नवर्यास देव म्हणून पुजते.
दुसरा मुद्दा बायका पुरुषांना निट वागत नाही सवाष्ण म्हणून मिरवायची हौस असते
बायकांची प्रसूती झाल्यावर खूप स्त्रियांना depression असते कधी कधी अगदी थोड्या कालावधी
साठी येते कधीकधी ते जातच नाही.  हा भाग आपल्या समाजाला माहिती पण नाही . त्यासाठी घरातले वातावरण चांगले असेल
तर बिना औषधाचे बरे होते नाही तर औषध घेणे भाग असते. ज्या स्त्रीया नवऱ्याला नीट वागवत नाही त्यांना बहुतांश depression
असते. पण हे घरात व त्या व्यक्तीला स्वतःला माहित नसल्यामुळे जे काही होते आहे तो स्वभावाचा भाग समजल्या जातो .
त्यामागे अजून कारणे  काही स्त्रियांना स्वतःच्या भावना मारल्या जातात आहे हे समजते पण मुद्दा सोडून दुसरे विषयाचे कारण घेऊन
चिडतात. कारण त्या स्वतःच्या मनात जे आहे त्याचा सामना करण्याचे धाडस कारण त्यांना असे वाटते जे संस्कार झाले आहेत
ते बरोबरच आहे प्रथांचा पगडा जबरजस्त असतो. पण अंतरमनात पटत नसते द्विधा मनस्थितीत काय होणार. हेच फक्त चीड चीड .
जीवन शेवटी आनंदाने जगाची गोष्ट आहे देवाला ,समजला घाबरून जगणे म्हणजे भ्याडा सारखे जगणे आहे. हे सुंदर जीवन माणसाने भरभरून जगण्यासाठीच
मिळाले आहे. ज्याला आवडत असेल त्याने नक्की धर्म पाळावे .  पण ज्याला आवडत नसेल त्याला जबरजस्ती नसावी एव्हढेच म्हणने आहे. जर आपल्या परंपरा संस्कृती धर्माचा पगडा इतका आहे तर का हा भ्रष्टाचार , बलात्कार ,व्यसनी, कुमारी माता , अनाथ मुले , तिसरपंथी भिक मागता , का वेश्यालये ,डान्स बार, दंगली,धर्मभेद ,जातीभेद  हे सगळे का घडते . आपण धर्म ,परंपरांच्या नादात नेमक माणूस घडवणे विसरलो आहोत असे नाही का वाटत ? संस्कारात दयामाया , प्रेम हे महत्वाचे भाग असावे असे नाही का वाटत ? माणुसकी हा जगातला सगळ्यात मोठा धर्म असावा असे नाही का वाटत ?
आभार
लक्ष्मी देसाई 

copyright© Laxmi Desai
 

No comments:

Post a Comment