पुरोगामी म्हणजे नक्की काय? शरीर उघडे दाखवून फिरण्याचं स्वातंत्र?
हा प्रश्न मी लिहिलेल्या एका लेखावर विचारला अजिबात राग आला नाही मला वाईट वाटले कि मला पुरोगामी किंवा मी जे स्त्रियांच्या स्वातंत्र्य बद्दल बोलते त्याचा गैर अर्थ घेतला गेला. मी इथे जेही लिखाण करते माझे सगळ्या पुरुष मित्रांशी बोलते हे माझ्या नवऱ्याला माहित आहे. हा प्रश्न मला विचारला माझी भारतीय स्त्रीची मुक्तता व माझे भारतीय पुरुष बांधवांकडून पुरोगामी विचाराची काय अपेक्षा आहे . मी जे डोळ्याने बघितलेले स्त्रियांचे दुःख, त्यावरून मीजी अपेक्षा करते ते जर चूक आहे तर मी आधीच क्षमा मागते
१.चार महिन्याचे बाळ घरी ठेऊन आर्किटेक आई जेव्हा तिच्या बाळाच्या ओढीने संध्याकाळी घाईत दारात चप्पल उलटी ठेवून येते कारण तिला तिच्या बाळाल दुध पाजायचे असते तेव्हा तिचा नवरा दारात चप्पल उलटी काढली हे दळभद्री लक्षण समजून त्या आईच्या गालपाडात खेचून मारतो ना मला त्या आईचे वात्सल्य समजून घेणाऱ्या पुरुष बापाची ह्यासाठी पुरोगामी विचार सरणी पाहजे त्या आईला दळभद्री लक्षणाचा विचार न करता तिच्या बाळाची घरी आल्यावर दुध पाजण्याचा अधिकारसाठी स्त्री मुक्ती पाहिजे .
२. मुलगा घरात नाही म्हणून साऱ्याचे वासनेने प्रवृत्त होऊन सुनेच्या पलंगावर जाऊन बसणाऱ्या त्या सासऱ्याने तिला मुलीच्या नजरेने पाहावे ही पुरोगामी विचारसरणी मागते . त्या सुनेने सासरी बलात्कार होईल ह्या भीतीत जगू नये ही त्या स्त्रीसाठी मुक्ती मागते .
३. आठ महिन्याच्या गरोदर स्त्री दिवसभर सासरच्या लोकांची बोलणी खात काबाड कष्ट करून बारा वाजता झोपायला जाते तेव्हा नवरा दारूच्या नशेत धुंद होऊन तिच्यावर बलात्कार करतो त्याच्या स्वतःच्या होणाऱ्या बाळाच्या जीवाची काळजी न करणाऱ्या बापाला मी फक्त माणुसकी ठेव येव्हाढच मागते अन त्या गरोदर बाईला रात्री सुखाची झोप मिळावी ही स्त्री मुक्ती मागते .
४. -२० डिग्री थंडीत रात्री २ वाजता आई आपल्या छोट्या मुलीला दारूच्या धूत नशेत असलेल्या वडिलांपासून वाचवून नग्न पायाने बर्फावरून पळते त्या आई अन मुलीची सुरक्षितते साठी मला स्त्रीमुक्ती हवी आहे.
५ . १७ वर्ष्याच्या पाच महिन्याच्या गरोदर स्त्रीला हुंड्यासाठी रात्रभर बेदम मारहाण होते आणि तिला पेटवून दिल्या जाते शेजारी डोळे देखत जळणाऱ्या त्या स्त्री वर एक बादली पाणी फेका अन तिचा जीव वाचवा. तिचे श्वास घेण्याचा हक्क हिरावू नका हा पुरोगामी समाज मी मागते .
६ जेव्हा हुंडा बळी गेलेल्या स्त्रीच्या वडिलांना म्हणते FIR करा सांगायला जाते ते वडील नकार देतात तेव्हा त्या मेलेल्या पोरीच्या आत्म्याला शांती मिळेल ह्यासाठी तरी न्याय मग हा पुरोगामी समाज मी मागते .
७. एका सहा वर्ष्याच्या छोट्या मुली समोर वडील रोज आईवर बलात्कार केल्याने मुलगी मुकी झाली त्या मुलीसाठी मी एक आनंदी परिवार मागते .
८रस्त्याने एक स्त्री जेव्हा निघाते ना तेव्हा वासनेने बरबटलेल्या त्या नजर झुकवा आणि तिला स्पर्श करून तिच्या मर्यादा ओलांडू नका हा पुरोगामी भारत मी मागते.
९. बलात्काराचे प्रमाण वाढले ह्यासाठी पुरोगामी व्हा आदर करा स्त्रिया भोगायची वस्तू नाहीत हे समजून घ्या म्हणते .
जावई जेव्हा सासरी जातो पंचपक्वनाने भरलेले रांगोळी काढलेले ताट वाढून मेजवानी खातात त्यामुळे सुनेचे सासरी काय अवस्था होते ह्याची कल्पना कशी करवणार तुमचा दोष नाही . रोज अन्यायाच्या बातम्या वाचून अन करून आपले आत्मेच मेले आहेत त्याला आपल्या जवळ काही इलाज आहे .
हो बोलली मी रामतिर्थिकर बाईंच्या विरुद्ध कारण एक विधवा झालेली स्त्री जर स्वतःच्या पायावर उभी नसेल तर तिला गरीबिपायी आपले शरीर विकावे लागते .
रामतिर्थिकर बाईना काय लागते बायांना काहीही बोलायला ह्या वाईट परिस्थिती जगणाऱ्या स्त्रियांनी फक्त स्त्री जन्म घेतला हे पाप केले काय ?
शरीर उघडे करून फिरण्यासाठी मी पुरोगामी व्हा म्हणत नाही . ७० टक्के डोमेस्टिक व्हायलन्स आहे भारतात स्त्रीवर अन्याय नका करू.
मला माहिती आहे काही स्त्रिया वाईट वागतात व्यभिचारी आहेत पण त्यापेक्षा जास्त त्यांच्यावरच्या होणारे अत्याचार आहेत .आपल्या सुसंस्कृत भारतीय समाजाकडून साधी माणुसकीची आशा करणे चूक आहे मी करते ही चूक रोज . मुलींची मोठ्याप्रमाणावर भ्रूण हत्या करता ना चांगले आहे कारण ती भ्रूण हत्यत्ये नाही मेली तर हुंडाबळी मरेल नाहीतर तिला जिवंत नरक भोगावा लागतो. हे वरील गोष्टी मी माझ्या डोळ्याने बघितल्या आहे ह्या स्त्रियांना मदत कारायचा अतोनात प्रयत्न केला आहे .
आभार
लक्ष्मी देसाई
No comments:
Post a Comment