Tuesday, September 2, 2014

Kavita va Charroli

सत्य..
जीवन हे अस्तित्व
सुख दुखाचे दृष्टांत
घेऊन घोर कष्ट
जगण्या साठी कटाक्ष
मृत्यू एकच सत्य...
!!!!! लक्ष्मी देसाई

  
नशिब
असा का हताश
होऊन दमला
नशिबही काळातच
आहे बांधला
तो कोणाला ...
आहे चुकला
!!!!! लक्ष्मी देसाई


 गाव
उरलेला मी
तुटलेल्या नात्याने
विखुरलेला मी
प्रेम वेडी तू
स्वप्न तू सजवली ...
उधवस्त गाव मी
घर तुझे सावली
या वाळवंटी गाव तुझे
कसे वसवशील
!!!!! लक्ष्मी देसाई
 


 सोबत
मनाच्या दरी वेदनांच गाव वसत
नैयनी सार जगात आनंदी दिसत
पण मी कुठही गेलो
तरी माझ गाव माझ्या सोबत असत
!!!!! लक्ष्मी देसाई

 मी सती
बेल वाहून शंकरासी
प्रत्येक पान स्वाः तुज नाम मुखासी
शतायुष्य लाभो मागणे देवापाशी
अखंड सौभाग्य मज लाभो आशा उराशी
सूर्योदय तुझा मजपाशी ...
पण रात रिझवतो नायकिणीपाशी
पतिव्रता मी जगणे संन्याशी
भक्ती अतूट आयुष्य निवारी तुज चरणाशी
सात जन्माची रेशीमगाठ मी सती प्रेमात तुझ्या उपाशी
!!!!! लक्ष्मी देसाई

 

No comments:

Post a Comment