Saturday, September 13, 2014

स्त्री पुरुष व तिसरापंथी

आज एक पोस्ट पहिली हिजड्याने हिजड्याचे काम करावे आणि मर्दाने मर्दाचे काम करावे. एका कट्टर हिन्दुवादिचि पोस्ट असावी. एक प्रश्न विचारावासा वाटतो. हिजडे आणि मर्द काय दोन वेगळ्या जागेतून जन्म घेतात का ? अरे आपल्याला साधी समज नाही जसे लोक आंधळे, मुके, बहिरे जन्माला येतात तसेच हिजडे जन्माला येतात. आपल्या अज्ञानाचे प्रदर्शन आपण किती शतके करणार आहोत.स्त्री पुरुष व तिसरापंथी असे  तीन लिंग जगात मान्य आहेत. अरे कोणी टाळ्या वाजवण्यासाठी किंवा भिक मागण्यासाठी जन्माला येते का ? आपण फेसबुकवर हे बोलतो आहोत.  हे एकविसावे शतक  विज्ञान आणि तंत्रज्ञानाचे युगाचे  आहे कमीत कमी ह्याचा वापर तरी माणुसकी जपण्यासाठी करा. कधी कधी वाटते काय दुर्दैव ह्या भारत देशाचे इथे जन्म झाला म्हणजे भेद नशिबाला बांधून आला. फक्त बदल दुसऱ्यांनी घडवायचे पण स्वतः नाही.कृपया खालील लिंक वाचा म्हजे कळेल काय आहे ते ?
http://transequality.org/Resources/NCTE_UnderstandingTrans.pdf


आभार
***शब्द शृंगार

No comments:

Post a Comment