Wednesday, September 3, 2014

मैत्री

 
 मैत्री
एक काळ होता तो
मी हवी म्हणून
आकांत केलास
माझ्या नकारत
त्या प्रेमाचा
अंत झाला
असा समज मी केला
आजही चोरून
बघतोस मला
निरोप द्यायला
लावतोस तुझ्या मैत्रिणीला
शिक्षा देतोस त्याची मला
शब्द दिसत नाही या डोळ्यांना
तेव्हढेच आवडत होते
तुझ्यातले मला
आवर घातला
असता भावनेला
नसते गेले विकोपाला
तुला जे पाहिजे
त्याला खूप उशीर झाला
परत ये यायचे तर
 जागा आहे निर्मळ मैत्रीला
नाही गेला त्याला आजही तडा
मी उभी आहे
येथेच तुझ्या स्वागताला
*****शब्द शृंगार
9/3/14
copyright© Laxmi Desai

No comments:

Post a Comment