Friday, September 12, 2014

हरवते नाते मैत्रीचे त्या संसाराच्या ओझ्यात



हरवते नाते मैत्रीचे त्या संसाराच्या ओझ्यात

आज मी लिहिते आहे ते विषय माझ्या आयुष्यात पहिल्यांदी लिहिणार आहे.  भारतीय स्त्रियांची मागास विचार सरणी. आपल्या येथे स्त्रियांना ज्याप्रकारे वाढवले जाते अतिशय संकुचित आणि एकेरी दृष्टीकोन लहानपणी पासून तिला घर कसे सांभाळायचे सासरी कसे वागायचे मर्यादेत कसे  राहायचे प्रथा कशा पाळायच्या हे परंपरागत शिक्षण घरात दिले जाते दुसरे  कॉलेज मध्ये ज्याने लाहिता वाचता व नौकरी पुरते शिक्षण घेतो. पण आपल्या समजत नवरा बायाकोंचे संबध कसे असावे दीर्घकाळ प्रेम टिकण्यासाठी काय करावे हे कधीच शिकवले किंवा बोलल्या जात नाही.  मुल व मुलीना दोघानाही स्वतःची समजा घेऊन खूप कमी लोक जन्माला येतात. बहुतेक लग्न आईवडील ठरवून करतात आपल्या जातीत वगैरे. लग्न होते सुरवातीला एकमेकां विषयी आर्कषण  वाटते नंतर मुले होतात संसारात गुरफटतात जवाबदारी येते. मग स्त्रिया आपल्या घरात इतक्या मग्न होतात की त्यांना कामे करणे व मुले सांभाळणे ह्या अतिरिक्त आपला जोडीडार आहे आपणही त्याच्या आयुष्याचा भाग आहोत पती व पत्नीने रोजच्या जीवना अतिरिक्त एकमेकांसाठी वेळ द्यावा लागतो संसार करत असताना तरच  पती पत्नीचे नात्यात ओलावा ठीकून राहतो. नेहमी दोष पुरुषांना दिल्या जातो. आपाल्य समजात लग्न झाल्यावर त्या संसारात स्त्रिया इतक्या गुरफटतात आणि पुरुषही त्यांना आपल्या भावना बोलायची सवय नाही किंवा भारतीय पारंपारिक पद्धतीचे जे ओझे बाळगतात त्याने लक्ष्यात पण येत नाही. पुरुषांची मानसिकता स्त्रियांपेक्षा वेगळी असते. त्यांना जरी लग्न झाले मुले झाली तरी त्यांना त्यांची पत्नी मैत्रीण म्हणून हवी असते.त्यांना बोरिंग बायको नको वाटते .सगळ्या पत्नी आपला नवऱ्याच्या आई सारखे वागतात खाऊ घालणे त्याची सेवा करणे म्हणजे आपण काम बरोबर करतो आहोत हा साधारण समज आहे.  घरातील मोठ्यानाही तेच छान वाटते .  व्रतवैकल्ये केल्याने नवारा आंनदी होत नाही. त्याला पत्नी मैत्रीण म्हणून वेळ द्यावा लागतो न चिडता त्याचेही सुखदुख एकावे लागतात कितीजणी करतात? फार थोड्या।  हो ते पुरुष आहे पण त्यानाही भावना आहेत. त्याच्या डोळ्यात अश्रू नाहीत म्हणजे त्यांना दुःख होत नाही असे नाही. एकतर स्वभाव न बघता लग्न केले जाते त्याच्यात सामजिक बंधने पाळण्यात आयुष्य जाते. कितीशा भावना जपल्या जातात दोघानच्याही पण जेव्हढा वेळ सोबत मिळतो तो तरी चांगला घालवावा आपण लग्न केले म्हणजे एकमेकांना दबून राहण्यसाठी नाही दोन मन जुळली पाहिजे त्यासाठी आणि तेही आयुष्याच्या शेवट पर्यंत पण असे होत नाही कारण भारतीय समजात पतीपत्नीच्या नात्यात मैन्टेनंस असतो हे कल्पनाच अस्तित्वात नाही तुम्ही म्हणाल परंपरेने लग्न झाली नाती टिकली नाही का ?? बरोबर टिकतात पण त्यात बऱ्याच पुरुषांचा शेवट पर्यंत रस संपलेला असतो. म्हणूनच ते बाहेर ख्याली होतात सगळेच ह्या कारणाने होतात असे नाही पण हेही एक कारण आहे. जुन्या काळी मुली कमी शिकायच्या आणि पुरुष उच्च शिक्षित असायचे मग पती पत्नी मध्ये विचारांची तफावत यायची नवऱ्याच्या कामकाजाचे विषय पत्नीला समजत नव्हते नाते दुरावायचे हे पण एक कारण होते १९व्या शतकात स्त्री शिक्षणावर भर दिल्या गेला होता . सुशिक्षित स्त्री तिच्या नवऱ्याला निट समजू शकेल हे प्रश्न त्याही काळी होते  आणि आजही आहे कारण आपण शिक्षण नौकरी पुरते घेतो पण संस्कार जुन्याच पद्धतीचे करतो.अरे कधी तरी रागलोभ विसरून तुझे माझे विसरून निट वागणे बोलणे केले तर इतके कठीण नाही.जगात कुठलाही पुरुष व स्त्री प्रेम आणि आदर ह्यानेच एकमेकांना बांधून ठेऊ शकतात. आपण सोबत आयुष्य काढायचे ठरवले आपले घरचे कुरुक्षेत्र का करतो ? आपल्या माणसाशी जरी आपण वादात जिंकलो तरी आपण ते नाते हरलो  व आपला माणूस आपल्या पासून तुटलेला असतो  . काय उपयोग एकत्र राहण्याचा ?  हा फक्त एक मुद्दा आहे स्त्रियांना दुखवायचा यात उद्देश नाही. पतीपत्नीच्या नात्यात दुरावे येण्यास बऱ्याच गोष्टी कारणीभूत असतात ह्यात वाद नाही. चूक असल्यास क्षमा असावी .
आभार
***शब्द शृंगार

No comments:

Post a Comment