निरागस
आपण सगळे लहानाचे मोठे होतो
मोठे होत असताना आपण वेगवेगळ्या
वय प्रमाणे जीवनाचे अनुभव घेतो
विध्यालयात शिकायला जातो
वया प्रमाणे आपले विषयक धीरगामभिर्य वाढते
काही गोष्टी निर्थक वाटतात.बालपणाचा विसर पडतो .
नौकरी लागली की मग आपण लग्न करतो साधारण
मग मुले होतात लहान बाळ साधारण दीड दोन
वर्ष्याचे होई पर्यंत दिवस बरे जातात.
एक नोंद महत्वाची घेणे आहे माणसाच्या बाळाला
अत्मनिरभरता किंवा स्वावलंबी व्हायला
दुसऱ्या कुठल्याही प्राण्यापेक्षा जास्त वेळ लागतो
आपल मुल १ वर्षा पर्यंत पूर्णपणे पालकावर निर्भर असते .
पण हळूहळू त्या मुलाला
थोडथोड कळायला लागत चालता बोलत येते
पालकांना वाटत ते अजूनही बाळ आहे
अगदी खर . पण ते बाळ शारिरीक रित्या
स्वावलंबी झाले असते. मग त्या बाळाची
जिज्ञासा तयार होते त्याच्या भोवतालच्या
प्रत्येक गोष्टीचे त्याला आकर्षण वाटते .
पालकांना समाज असा होतो की
हे मुल खूप खोडकर आहे
लहान मुले कधीकधी अतिही
करतात . ते बघून आई किवा वडील
भांबावून त्याच्या अंगावर जोरात ओरडतात
किंवा संयम सुटून मारतातही आणि
हे साधारण ते मुल समजदार होई पर्यंत चालते.
कधीकधी काही घरात बऱ्याचदा विषय विकोपाला
जातात . आता मला म्हणायचे नाही की मी वेगळा आहे
आपण सगळे ह्यातून जातो, कारण
आपल्याला लहानपणी आपली
आईवडील सांभाळतात त्यामुळे
मुल कशी समभाळायाची हा अनुभव नसतो
हेच कारण आहे मुलांनी खोडी केली की पाहीलेतर आपण
घाबरतो की त्याला काही इजा होईल त्या काळजीने
आपली प्रतिक्रिया दाखवतो रागावून किवा चापट
मारून . तीन ते साडेतीन वर्ष्याच्या मुलाला
जीवनाचा काहीही अनुभव नसतो त्याच जगण
फक्त वर्तमान काळात असते . हा मुद्दा आपण कधीच
लक्षात घेत नाही . जेव्हा तुम्ही त्याला रागावता किंवा
मारता तो ह्यातून हा अर्थ काडतो की जेव्हा तुम्ही रागावल किंवा मारलं
तेव्हाच तो जे करतो आहे ते करण थांबवायचे. हे प्रमाण आपणच त्याला शिकवतो ते मुल मोठ होई पर्यंत असेच चालते .
नंतर आपणच म्हणतो याला काही रागावल्या, मारल्याशिवाय
कधी कुठली गोष्ट समजत नाही. आपणच हे प्रमाण
त्याला शिकवले नेमके विसरतो
महत्वाचे असे की आईवडीलानी मुल होण्याआधी
बाल मानशास्त्र व बालविकास कसा करावा
ह्याचा अभ्यास थोडा तरी नक्की करावा .
आपले मुल हे एक दुसरे व्यक्ती आहे आणि ते
त्याचे विचार आचार हे त्याच्या परिस्थिती व संस्कारा
प्रमाणे होतात . आपण लहानपणी कसे होतो ते नियम
आणि अनुभव इतंभूत त्याला लागू होत नाही .
जर ह्या छोट्या गोष्टीकडे लक्ष्य दिले तर कितीही
खोडकर मुल सांभाळता येते .
दुसरा मुद्दा मुलानी कधीही हट्ट केला की
त्याचे लक्ष दुसरीकडे वेधायचा आपण प्रयन्त
करतो ते चूक आहे . ते मुल याच घरात
व जगात वाढणार आहे त्याला इथले नियम
समजलेच पाहिजे . दुकानात गेल्यावर वस्तू
त्याने मागितली जोरात रडणे चालू केला
तरीही अपल्याला असे वाटत असेल की घेऊन द्यायची गरज नाही.
का नाही घेउन द्यायचे कारण सांगायचे आणि स्पष्ट सांगायचे
पुढल्यावेळेला
रडलास तर दुकानात नेणार नाही तसेच
एकदा कराचे जाताना त्याला सागायचे मी दुकानात चाललो
तू मागे रडला म्हणून तुला नेत नाही रडू द्यायचे. बघा मुल सरळ होत
की नाही .
ह्यावर अजून उपाय दुकानात जायच्या आधी
त्याला स्पष्ट सांगायचे आज तुझ्यासाठी काहीही नाही घेणार
त्यामुळे दुकानात हट्ट करायचा नाही निट जर वागला तर त्याचे कौतुक करायला विसरायचे नाही .
प्रत्येक माणसाला त्याच्या गरजा असतात छोट्या मुलांच्या सुध्द
त्याची गरज किंवा आवडती वस्तू काढून घ्यायची
एकले नाहीतर रागवायची अथवा मारायची गरज पडत नाही.
लहानपणी ज्या मुलाना हिंसेचा परिचय कमी किंवा अजिबात झाला नाही तर पुढील आयष्यात ते उत्तम नागरिक आणि दयाळू ,अहिंसक व्यक्ती होतात .त्यांच्या भोवतालची नाती व लोक सुखी असतात .
हे तज्ञांनी सिद्ध केले आहे.
धन्यवाद *******शब्द
No comments:
Post a Comment