Sunday, September 21, 2014

हरतालिका



हरतालिका
एकदा एका लहान मुलीला
तिच्या आजीने विचारले
ये हरतालिकेची पूजा करायला
त्या मुलीने आजीला विचारले
का करू मी ही पूजा
आजी म्हणाली नातीला
तुला चांगले सौभाग्य लाभेल
लहान मुलीच्या चेहऱ्यावर प्रश्न चिन्ह आजीला
दिसले. अग तुला चांगला नवरा मिळेल .
नात आजीला विचारते मग माझा नवरापण हे व्रत करत
असेल का ? त्याला चांगली बायको मिळावी म्हणून ?
आजी म्हणते नाही मुल हे व्रत करत नाही .
नात म्हणते आजी तू आजोबांसाठी सगळे उपवास करते
आई बाबांसाठी करते पण आजोबा बाबा कधी तुझ्यासाठी
आईसाठी नाही करत.
आजीला वाटत भोळी तिची नात ती हसते ती म्हणते
की पती हा पत्नीसाठी परमेश्वर असतो.
नात म्हणते तू देवाची पूजा का करतेस ?
आजोबांची पूजा का नाही करत ?
आजी विषय टाळून विचारते मग करणार पूजा अन उपवास आज
नात: नाही आजी मी फक्त देवाचीच पूजा करेन माझा होणारा नवरा कोण हे पण
मला माहिती नाही आजी मी नवरा चांगला मिळाव यासाठी कधीच पूजा नाही करणार
माझ्या आईनेही केली होती तरी बाबा तिच्याशी चागले वागत नाही . मी अशाच माणसाशी
लग्न करेल जो माझ्याशी चांगला वागेल. नाहीतर करणार नाही.
आजी उत्तर एकूण चाट होते. नात मात्र मैत्रीण सोबत खेळायला जाते.
धन्यवाद 
******शब्द शृंगार

No comments:

Post a Comment