पोकळ अपेक्षा संस्कारी व सुजाण तरुणाई
आपण सगळे लहान व तरुण मुलांना बऱ्याच प्रमाणावर निष्क्रिय झाले काहीच करत नाही, व्यसन करतात, उद्धट वागतात , आईवडिलांबद्दल आदर संस्कृती व परमंपरां पाळत नाही वगैरे तक्रार करत असतो. मलाही कबुल आहे असे झाले आहे. पण आपण कधी विचार केलाय हा बदल ह्या पिढीत का झाला ? कुठेतरी आपलेच सर्वांचे चुकले असे नाही वाटत? जेव्हा एक सुजाण नागरिक घडवायचा असेल तर त्याला देशातील व्यवस्था , सामजिक घडण , शाळा , पालक हे सगळे जवाबदार असतात. गरिबांकडे परिस्थिती वेगळी असते त्यांची मुले लाडाने वाया जात नाही सभोवतालच्या वातावरणाने वाया जातात. पण मध्यमवर्गीय आणि श्रीमंतांना मुले बिघडतात किंवा वरिल कुठलेही कारण असू शकते. ह्या दोन्हीही घरात मुले जन्माला आल्यावर मुले म्हणण्यापेक्षा मुल खूप घरांनमधे एकाच आपत्य जन्माला येते मग आईवडिलांना ते मुल अतिशय प्रिय त्याच्यासाठी काय करू आणि काय नाही असे होते साहजिक आहे प्रत्येक आईवडिलांना त्यांचे मुल प्रिय असणारच पण एक गोष्ट लक्ष्यात ठेवून ते मुल वाढवायचे चुकतात हे मुल मोठ होऊन ह्या देशच नागरिक होणार आहे तसेच त्याला त्याच्या आयुष्याची जवाबदारी तसेच त्याच्या परीवाराचीसुध्दा जवाबदारी घ्यायची आहे. हे भविष्य सगळ्यांनाच लागू असते. जेव्हा ते मुल लहान असते आईवडील त्यान रडल की जे मागितले ते द्यायचे विशेष करून बाहेर गेल्यावर हे त्या मुलालाही माहित असते आपण गोंधळ केला की आपल्याला जे पाहिजे ते मिळणार आणि हे तो तुमच्याकडूनच शिकला लहान मुल रडणे, पहिले तर ह्यात घाबरायची काही गरज नाही त्यांना शब्दांची संख्या कमी असते त्यामुळे त्यांना बोलून काही गोष्टी आपल्याला पटवता येत नाही आणि दुसरे लहान मुलांना व्यवहार कळत नाही . मग रडणे हा उपाय. मग त्यात घबराण्यासारखे काय आपल मुल आपण ओळखत असतो आपल्या जवळ शब्द संख्या भरगोस आहे आणि पटवताही येते समजशाक्तीपण प्रबळ असते त्यामुळे धैर्याने राहायचे. लहान मुल रडते थोडावेळ नंतर थांबतात.त्याच वेळला आईवडील दुसरी चूक करतात त्याला काऊ आला आणि चिऊ आली सांगतात तसे करायचे नाही जेव्हा तुम्हाला वळण लावायचे आहे त्याचा हट्टीपण घालवायचा असेल तर त्याला तुमचा नकार सहन करावा लागेल आपल्या आईने नाही म्हटल्याचे दुःख त्याला सोसावे लागेल इथेच सुरवात होईल की आपल्याला आयुष्यात प्रत्येक गोष्ट आपल्या मना प्रमाणे मिळणार किंवा होणार नाही. दुसरे वयाच्या दोन वर्षा पर्यंत तुम्ही त्याला खाऊ घाला पण दुध पाणी सहाव्या महिन्यापासून आपल्या हाताने जर बाटली देत असाल तर पिता येते काही महिने इकडे तिकडे ते प्रत्येक मुलांवर अवलंबून असते. मात्र दोन वर्षानंतर त्याला हाताने खाऊ द्या. त्यांनी मागितल्यावरच खायला द्या म्हणजे त्याला स्वतःची तहान ,भूक काय आहे ते समजले पाहिजे . दहा वर्ष्यापर्यंत भरवणारी आई बघितली आहे आश्चर्य होते आपणच आपल्या मुलाला दुर्बल करतो आहोत हे आंधळ्या प्रेम पोटी आईलाच कळत नाही. हे झाले शारिक गोष्ट आत बौद्धिक वयाच्या सहा महिन्यपासून मुलाला गोष्ट सांगू शकता पुस्तकातील चित्र दाखाऊ शकता खेळणी द्या ज्याने ब्रेन स्टीमुलेट होते असे . लहान मुलांशी कधी ओरडून बोलायचे नाही जसे आपण त्यांना वळण लावतो न तसाच स्वतःलाही लावावे लागते पालक होण आणि मुले सांभाळणे ही कठीण गोष्ट आहे पण स्वतःतहि बदल घडवला तर आपल्याला हे काम छान जमू शकते. हळूहळू मुल मोठी होतात शाळेत जायला लागतात त्यांना विविध कला, क्रीडा , वाचन ह्या गोष्टींची आवड लावावी. हे पालकांची जवाबदारी झाली.
मग शाळांसाठी स्पर्धा त्यासाठी लागणारे अनुदान आईवडिलांची होणारी दुसमुस चिडचिड ते मुल पाहत असत. शाळेत उद्धट वागणारे शिक्षक प्रत्येक गोष्टीवर ताणणारे शाळेतील नियम व सोबत शिकणारी मुले ह्या सगळ्या गोष्टीचा परिणाम त्यामुलावर होत असतो वयाच्या तेरा चौदाव्या वर्षी त्याला समज येते वास्तविकतेची परिस्थितीची जाणीव होत असते. हीच वेळ असते लहानपणी दिलेले संस्क्रार कामी येतात जर ते मुल ज्ञानाने समृद्ध असेल तर त्याला विचार शक्ती असते त्याला चांगल्या वाईटाची पारख करता येते. त्याच्या समोर जे ध्येय आहे त्यापर्यंत कसे पोहचायचे त्याचा मार्ग तो शोधतो. पण हीच वेळ आई वडिलांची परीक्षा असते ह्यावयात मुल आपले व्यक्तिमत्व शोधत असतो. त्यांच्या काळ व परिस्थिती प्रमाणे बदल होतात कधी कधी विचित्र वागतात तुम्ही शाळेत गेले की ते तुम्हाला ओळख दाखवत नाही शाळेत सोडताना बाय करणार नाही त्याचा अर्थ ते पालकांवर प्रेम करत नाही असा नाही. त्यांना त्याचे घरातील सुरक्षित वातावरण पासून बाहेरच्या जगात ओळख पटववून द्यायची असते त्यांना त्यांचे नविन स्वतःचे अस्थित्व असावे हि जाणीव होते. कमीत कमी असे तीन चार वर्ष चालते तेव्हा आपणही त्याला घरातील नियम सांगावे काय चालेल काय नाही त्याबरोबरच त्याच्या छोटय मोठ्या चुकांकडे दुर्लक्ष्य करायला शिकावे लागते म्हणजे त्याला बिना व्यत्यय व आत्मविश्वासाने स्वतःचा शोध घेता येतो जर आपण होणारे बदलाचा वाऊ केला तर तुम्ही आपल्या विषयीचा आदर गमावता त्याला घरच्यांवर जो विश्वास असतो तो तोडता. त्यामुळे ह्यावयातील मुलांशी कमी शब्द व स्पष्ट बोलावे ते तितके समजदार झालेले असतात. त्यांच्या शिक्षणासाठी प्रयत्न त्यांनी केले पाहिजे पालकांनी नाही. जेही मार्क पडले जिथे दाखला मिळेल तेथेच जाऊद्या म्हणजे त्याला काय करायचे त्याची जवाबदारी कळते अगोदर केलेल्या चुकीची जाणीव होते. एकदा आठवर्षानंतर सांगायचे तू तुझी डिग्री घेऊन स्वतःच्या पायावर उभे राहा. माणसाच्या मुलाला खूप बुद्धिमता असते. तो वाढताना शिकत असतो आजूबाजूला होणाऱ्या घडामोडींनी देशात चाललेल्या भ्रष्टाचाराचाही त्याला जाण असते. त्यामुळेच बरेच तरुण देशाच्या बाबतीत आशाहीन हताश होतात त्यांना जी डळमळीत व्यवस्था आहे त्यामुळे त्यांना वाटते ह्यादेशात मला काही भविष्य नाही इथे कोणाचे काही चांगले होऊ शकत नाही साहजिक आहे असे वाटणे तरुण वय उमेदीचे वय असते जिथे पहिले वाहनाचा परवाना घेतांना पहिली लाच त्या तरुणाला द्यावी लागते तिथे आईवडिलांनी केलेले संस्क्रार हरतात. म्हणूनच एक सद्गृहस्थ व सुजाण नागरिक घडवण्यासाठी सगळ्यांचे हातभार असावे लागतात हे अगदी थोडे मांडले आहे पण कितीतरी गोष्टी आहे कॉलेजला दिलेले अनुदान आपल्यापेक्षा कमी गुण असलेल्या मुलाला श्रीमातीमुळे चांगल्या कॉलेज मध्ये जाता येत व आपल्या आईवडीलांची अयपत नसल्याने आपल्याला आपली इच्छा मारून दुसरीकडे दाखला घ्यावा लागतो. ह्याने तरुणांना निराशा येणार नाही तर काय ? सगळे दोष त्यांच्यावरच लादून नाही होत म्हणूनच ते विरोधक भूमिका घेतात त्यांचा त्रागा कुठे काढणार. आईवडील जर चूक केली तर कधीच माफी मागत नाही कसा मग समाजआणि देश असणार फक्त अहंकार जोपासायचा कसा हेच ठाऊक असते . आपणच आपले संस्कार व वास्तविक जीवनातील तफावत हेच कारण आहे तरुण पिढी बिघडायला आपल्याला देशाची व्यवस्था व मनुष्याच्या मानसिकतेचा अभ्यास करण्याची गरज आहे. तरुण मुलांना कल्पक गोष्टी करण्याची संधी आपण उपलबद्ध करू शकलो नाही हेच कारण आहे नविन संशोधन होत नाही ह्या दुर्बल व भ्रष्टाचारी व्यवस्थेमुळे आपल्या देशात चौकस बुद्धी मारल्या जाते. नविन काही करण्याची संधी मिळत नाही. हा विचार जर आजही नाही केला तर येणाऱ्या कित्येक पिढ्या आपण गमावू ह्यात शंका नाही .
धन्यवाद
लक्ष्मी देसाई
No comments:
Post a Comment