जगातील दुसरे धर्म निरपेक्ष देश
अमेरिकेत ४३% लोक चर्च मध्ये जातात हे लोकसंखेच्या मानाने कमी आहे. राहिला dollar च्या नोटेचा प्रश्न "In God we Trust" अमेरिकेला स्वतंत्र होऊन २३८ च्यावर वर्षे झाली आहेत त्या काळात १७७६ मध्ये जी घटना लिहिल्या गेली त्यात बरेच काळा व गरजेनुसार बदल करण्यात आले आहेत. ज्याही प्रथा जसे नोटेवर जे लिहिलेले आहे किंवा God Bless America जी म्हणायची पद्धती आहे ती जॉर्ज वाशिंग्टन पासून आहे त्यांच्याही परंपरा आहे इथे पहिले राष्ट्रपती व फौन्डेर फादरस चा खूप सन्मान आहे.हा त्यांनी अवलंब केलेल्या पद्धतीचा मान म्हणून केल्या जाते इथे प्रत्येक धर्माची देवळे चर्च मस्जिद सगळे आहे आणि कधीही दुसर्या धर्माच्या लोकांच्या भावना दुखावत नाही Jews शुक्रवार ते शनिवार पर्यंत साबथ पाळतात ते कुठलेही mechanical गोष्टी वापरत नाही कार , एलिवेटर वगैरे शुक्रवारी ते लवकर घरी जातात व कितीही महत्वाचे काम असले जर त्यांना ऑफिस मध्ये शनिवारी बोलावले तर ते येत नाहीत पण त्यांच्यावर कोणीच जबरजस्ति करीत नाही लोक दुसर्या धर्माचा आदर करतात. पण सगळे व्ययक्तिक असते धर्म ह्या विषयावर कोणी चर्च्या करत नाही. तिथे सरकारी कार्यालयात मेरी क्रिसमस म्हणत नाही कारण त्याने दुसर्यांच्या धर्मियांच्या भावना दुखावल्या जातात ते Happy Holiday म्हणतात .हा क्रिस्त धर्म मोठ्याप्रमाणावर असलेल्या देश्यातल्या लोकांवर अन्याय आहे. पण तिथे आपल्या धर्माचे भले नाही बघितल्या जात तिथे देशाची भलाई आणि प्रगतीचा विचार केल्या जातो. आपल्याला तीत पर्यंत पोहचायला वेळ आहे लोकांना खायला नाही कशावरूनही डोके भडकतात ते सुधारेल मग बघू .धर्माच्या नावावर तिसरपंथी भिक मागतात असे धर्म आणि परंपराचे प्रमाण कमी झाले पाहिजे फक्त व्यक्तिगत आपल्या घरात धर्म पाळावा येव्हढे जरी केले तरी खूप आहे.
जातीयवाद भेदकनार्याना निवडून दिले नाही.तेव्हाच देशाची प्रगती होणार आहे आपापसात भांडून नाही. इतकी गेल्या कित्येक शतकांपासून मुस्लिम फारसी जुस्ज क्रिस्ती लोक आपल्या इथे आहेत ते हा देश सोडून कुठे जाणार आहेत. आपल्याला एकोप्याने राहायल शिकावेच लागणार आहे. माझ्या भारताची प्रगती कशी होईल याचा विचार करा. माझ्या जाती धर्माची प्रगती नाही धर्म ही आस्था आहे त्याची प्रगती किंवा भक्त वाढल्याने मनुष्याचा विकास होता नाही हा अध्यामिक व भावनिक भाग आहे . त्यात देशाची प्रगती होत नाही त्यात मनुष्य विचाराने व मनाचे शुद्धीकरण होते . चांगलीच गोष्ट आहे त्याने हव्यास कमी होऊन भ्रष्टाचार कमी होऊ शकतो पण असे होत नाही आहे त्याचाच अर्थ कुठतरी आपले गणित चुकते आहे कोणी तुमच्या धर्माला किंवा जाती बद्दल वाईट बोलले आपल्याला खूप राग येतो . पण त्याच्या एवजी कोणी कायदा तोडला किंवा घटनेचे पालन केले नाही तर का राग येत नाही भ्रष्टाचार करण हे कायदा व घटनेच्या विरुद्ध आहे तेव्हा आपले रक्त नाही खवळत तेव्हा आपला स्वार्थामुळे आपली देशभक्ती कमकुवत होते आपण वयक्तिक स्वार्थासाठी लाचार होऊन कायदे तोडतो. जात धर्माचे रक्षण करायला आपण आदिमानव राहिलेलो नाही आपण प्रगत एकविसाव्या शतकाती सुसंस्कृत मानव आहोत मोबाइल आणि कॉम्पुटर्स वापरतो. पण तरीही आपण देश आणि धर्म कधी वेगळा करायला शिकणार आहोत हा प्रश्न कायमच आहे का बदल घडत नाही? ह्यात घरात व शाळेत देवभक्तीवर खूप जोर देण्यापेक्षा देशभक्तीवर जास्त जोरा असला पाहिजे. तेव्हाच येणारी पिढी आपल्या देशास प्रगतीपथावर नेऊ शकेन .
आभार
लक्ष्मी देसाई
No comments:
Post a Comment