Sunday, September 21, 2014

विचार सरणी



विचार सरणी
माणसाला नेहमीच कशाच्या तरी आधाराची गरज भासते त्यामुळेच धर्म ,जात, देव ह्या कल्पनेला भरगोस प्रतिसाद मिळाला तसा जर पूर्वेकडील देशांचा (भारत,चीन,पराशिया (इराण)इराक )प्राचीन इतिहास बघितला ह्याच देशांनी गणित , भूमिती , अर्थाशात्र , विज्ञान , कला , साहित्य वैगरे ह्यांची पहिली प्रमेय(theorem आणि theories) मांडल्या आणि विशेष म्हणजे त्यांच्या धर्म ग्रंथ वाचून आणि काही नवीन तयार करत असताना पण पुरातन काळात समाजाची घडण वेगळी होते तिथे विचारवंताना प्राधान्य होते म्हणूनच आजही अरेबिक अंक आणि भाराचा दशंम  वापरला जातो . पण मिडवल टायीम थोडे आधी
आपल्या पूर्वेकडील देशानमधील समाज  पद्धतीत बदल घडला. माझ्या अंदाज प्रमाणे भारता परकीयांचे आक्रमण आणि सत्येने जनतेची विचार सरणी बदलली किंवा धर्मान्तारांची सक्ती किंवा ज्याप्रमाणे धर्म जोपासायचे किंवा पद्धती त्यावर नक्कीच बंधने आली असणार. त्याचमुळे जे शिक्षण व संस्कार
होत होते आणि त्यातून जे तज्ञ घडले आणी विचारवंत जनतेचा विलोप होऊ लागला.कालांतरानी इंग्रज आले त्यानंतर मात्र सगळेच बदलले काही चांगले
व काही वाईट ते आपल्या सगळ्यांच्याच परिचयाचे आहे. पण एक गोष्ट यावरून सिद्ध होते कुठलीही गोष्ट अभ्यास व मनन करून जर  जोपासल्या नाही तर त्याचे जे विपरीत परिणाम होतात ते हे. या उलट पाश्च्यात देशातील लोक आपल्या कडे येउन उदाहरणार्थ ग्रीकाने परशियाकडून भूमिती आणि कलेचे ज्ञान मिळविले. भारताती वेद नेले त्यामधील तत्वज्ञानाचा त्यांनी उत्कृष्ट उपयोग केला व ते ज्ञान त्यांनी जोपासून त्याचे अधिक विस्तार केला. पूर्वेकडील देश मात्र नुसत्या धर्माच्या आणि प्रथांच्या  जाळ्यात  अडकून मागे राहिले. बघा पटत असेल तर तुमच्या  विचारांचे  स्वागत आहे .
धन्यवाद
लक्ष्मी देसाई

No comments:

Post a Comment