Tuesday, September 2, 2014

वेड्य मनाला

 अंकुर
उठलेल्या वादळाचा
तूझा अंकुर आहे पुरावा
जरजर जखमांचे घाव
देती वेदनेला सराव
प्रेम माझ उराव ...
तू नामानिराळ रहाव
!!!!! लक्ष्मी देसाई

   गाफिल मी
भेटीत पहिल्या घायाळ मी
नजरेत तुझ्या काबीज मी
त्या पावसात भीजून चिंब मी
काळीज देऊन बसलो गाफिल मी
!!!!! लक्ष्मी देसाई

   देखणी
अशा अजाण वेळी
एकून तुझी पैजणी
काहूर उठले माझे मनी
तू शांत उभी समोर देखणी
!!!!! लक्ष्मी देसाई

 वेड्य मनाला
 सोबत तुझ्या असतांना
कधी जाणीव नव्हती मला
विरहाच्या या क्षणांना
प्रेम बावरी मी सख्या
कसे आवरू भेटीस तुझ्या ...
आसुसलेल्या या वेड्य मनाला
घरटे माझ्या जवळी वेड तुझे त्याला
!!!!! लक्ष्मी देसाई

    
 अश्रूं
ओघळलेल्या अश्रूंना
दुःख कधीच कळत नाही
दुःखावले मन आसवे गाळ
हे डोळ्यास कधी सांगात नाही
!!!!! लक्ष्मी देसाई

      रिते
तुझ्या रित्या काळजाची
मला जाण आहे रे
ओसाड रानी मृगजळ मी रे
तुझे हरवलेले तुझ्या
सदनीच आहे रे
!!!!! लक्ष्मी देसाई
 ९/६/१४


No comments:

Post a Comment