जय शिवराया
कधीकधी वाटते या महाराष्ट्राच्या मातीत शिवबा जन्मालाच आला नव्हता. त्यांनी कधी हिंदवी स्वराज्याची स्थापनाच केली नव्हती . या भारतभूमीचे दुर्दैव आहे इथला नागरिक तिच्या कडे दुर्लक्ष्य करतो व भारतभूवर झालेला अन्याय तुटपुंझ्या आरक्षणात विकतो . इथे प्रत्येक जातीला न्याय मिळतो पण या भारतमातेवर अन्याय होतच राहातो. इथे माणसांची भक्ती करतात पण देशाला वयक्तिक स्वार्थासाठी विकतात. इथे दगडाचा देव श्रीमंत आहे पण ही भारतमाता दरिद्री आहे . इथे धर्मासाठी जीव दिले जातात पण स्वार्थासाठी भारतमातेचा गर्भात खंजीर खूपसतात. इथ पूत नाही कपुतच जन्माला येतात .
जर खरे आपण शिवाजींचे वंशज असू ना तर फक्त विधानसभेच्या निवडणुकांन आधी दिलेले हे आरक्षण लक्ष्यात ठेवण्यापेक्षा आठवा १९९३ पासून झालेल्या बॉम ब्लास्टच्या शृंखला ,कारगिलच्या सैनिकांच्या विधवांसाठी बनवलेले आदर्श इमारतचा घोटाळा ,कसबला उशिरा दिलेली फाशी ,१२० करोडचे शिक्षण संस्थांचा घोटाळा ,७०,००० करोडचा इर्रीगेषन घोटाळा , पोलिसांच्या बुलेटप्रुफ जाकेटचा घोटाळा ,२८९ करोडचा चारा घोटाळा . त्याबरोबरच महाराष्ट्राचे कृषिमंत्री व गृहमंत्री असताना शेतकऱ्यांनी केलेल्या आत्महत्या , शेतीसाठी नुकसान भरपाईचे विमाचे पैसे बँकांनी आपला हिस्सा काढून शेतकऱ्याला दिलेली तुटपुंजी रक्कम अहो ह्यांनी बँकांचे फायदा केला शेतकऱ्याचा नाही लक्ष्यात घ्या . बाजार समित्यांनी व्यापाऱ्यांना विकलेले सरकारी गोडाऊन , आपले महाराष्ट्रातले देशाचे कृषिमंत्री असताना वाढेले कांद्याचे भाव त्याने व्यापाऱ्याला फायदा झाला सामन्या व गरीबाची कांदा भाकर हिरावून घेतली ह्या सरकारने .
जेव्हा मराठा आणि मुसलमानान निवडनुकन आधी जाहीर केलेले आरक्षण कधी विचार करता प्रत्येक जातीला आरक्षण दिल्याने फायदा होइल का ? नाही
जर सरकारने नौकाऱ्या उपलब्ध होणाऱ्या योजनानामध्ये भ्रष्टाचार केला तर कुठलीही योजना तडीस जात नाही . तुमच्या करच्या पैस्याने चालवलेल्या ह्या योजनाचे पैसे ह्याच्या घरात जातात . आपल्या नेत्यांना विचार किती योजना पूर्ण केल्या मागील दहा वर्ष्यात आणि नसतील केल्या तर का नाही ?
ह्यांनी केलेल्या कारनाम्याचे हिशोब मागा जेव्हा मत मागायला येतील तेव्हा . एकदातरी जागा दाखवा ह्यांची ह्यांना . तुमच्या मत मध्ये काय ताकत आहे कळू द्या . हे खुर्चीवर तुमचे मत घेऊन बसतात विचार करून जवाबदार लोकांना निवडून द्या कधीतरी भारतमातेला न्याय द्या . या महाराष्ट्राच्या मातीचा सन्मान करा . त्या शिवबाची आन राखा.
जय महाराष्ट्र
आभार
शब्द शृंगार
No comments:
Post a Comment