प्रयन्तनालाच अर्थ तेच समाधानाचे सार्थ
व्यवस्था आणि सामाजिक विचारसरणी बदलाणे आवश्यक आहे
नुसते आत्महत्या करू नको म्हटल्याने किंवा मौक्ष मिळणार नाही याने हे थांबणार नाही
फक्त डॉक्टर आणि एनजिनियर होण म्हणजे यशस्वी होणे असे नसावे. इतका मोठा देश
चालवायला वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांची आवश्यकता असते. कुठले काम
उच्च किंवा नीच नसते. १०वि किंवा १२वी मधे नापास होण्याने व कमी मार्क मिळाल्याने कोणी मूर्खही ठरत नाही .
परीक्षा देणे हिपण एक कला आहे ती साऱ्यांनाच अवगत होईल असे नाही. २ तासाच्या परीक्षेवर कुठलाही व्यक्ती
हुशार आहे किंवा नाही हे तर नक्कीच ठरवता येत नाही. दुसऱ्या देशांमधे ह्या प्रकारे शिक्षण नाही. एका वर्षाच्या
मार्कांवर तर कॉलेजात दाखल होता येत नाही तिथे ९ ते १२ चार वर्षाचा निकाल बघून कॉलेजमध्ये जाता येते .
तिथे मुले काम करून शिकतात १२ वि पर्यंत अगदी थोडे काम करतात. पण कॉलेज मध्ये जर शिष्यवृत्ती मिळो
किंवा न मिळो त्यांना काम करून शिकावे लागते. शिष्यवृत्ती मिळाल्यास कॉलेजमधे काम मिळते नाही तर बाहेर
करावे लागते . विचार करा अनुभव नसलेल्यांना वेटर, मॉल मध्ये काम मिळते ते करतात . दुसऱ्या देशात
डॉक्टर होत असतांना त्याला वेटरचे काम करावे लागते तिथे आई वडील शिक्षण महाग असल्यामुळे पैसे भरू शकत नाही
मुलालाच त्याच्या शिक्षणाचे कर्ज फेडावे लागते.
आपल्याकडे आईवडील मुलांच्या शिक्षणाचे कर्जही फेडतात. त्यामुळेच प्रवेशा साठी अमाप पैसा मागतात हे त्या संस्थांच्या
भ्रष्टाचाराचे कारण आहे . आपण आपल्या बुद्धी व आवडी प्रमाणे जर शिक्षण घेतले तर आपण त्यात पारंगत होतो. आपल्या
आवडीच्या क्षेत्रात उच्च शिक्षण घेऊ शकतो.
एक गोष्ट महत्वाची आहे ती म्हणजे हे सगळे मार्क वगैरे गोष्ठी फक्त १२ पर्यंत महत्व आपल्या घराचे किंवा लोक स्तोम करतात
म्हणून पुढल्या आयुष्य आपण माणूस म्हणून कसे जगतो हे फार महत्वाचे आहे . मार्क हा भाग आयष्यात एक चौथन्श जर १८
वर्ष पर्यंत पण पुढचे सगळे आयष्य आपण कसे जगतो माणुस्कीला जागुन तो काळ खूप मोठा आहे मला असे नेहमी वाटते
किती मार्क घेणारा किंवा उच्च शिक्षित व्यक्ती ह्या चांगल माणूस व सुजाण नागरिक असण महत्वाचे आहे . आपण कितीतरी उधारणे
बघितले तर आजचे पंतप्रधान , अबदुल कलम ह्यांनी गरिबीतून दिवस काढून वर आले. कितीतरी तज्ञ खूप हाल अपेष्टा सहन करून
पुढे आले . अब्राहम लीन्कॅन खूप वेळा अपयश झेलले पण काळ्या लोकांना गुलामीतून त्यानेच सोडवले . ते नापासही झाले होते.
पण आपल्याला जीवन मिळाले ते काही कारणास्तव प्रत्येक माणूस या भूमीवर कुठल्या तरी हेतूने जन्माला आल आहे. काही
लोकांना लावकर समजते काय करायचे काहीना उशिरा पण आपण सगळे शेवटी माणसे आहोत कोणी मोठा छोटा , मोठा नाही .
फक्त आपल्या बुद्दीमात्तेच्या जोरावर आपण अवघड व्यवस्था तयार केली आहे
. त्यामुळे आयुष्यात प्रयत्न करणे हे महत्वाचे .
प्रयन्त हा एक मोठा अनुभव आहे . त्यापुढे यश अपयश हे नगण्य होते . जरी आज कमी मार्कपडले असतील तुम्हाला काही विषय
आवडत नसतील किंवा अवघड जात असतील पण पुढे आवडीचे विषय जर घेतले त्यात चांगले यश प्राप्त होईल . आशेशी मैत्री असण
खूप छान असत मित्रानो ती आपल्या बाजूने असेल तर यश पण त्याच बाजूने येते . तुम्हा सगळ्यांनाच उज्वल भविष्यासाठी मःनपुर्वक
शुभेच्छा
धन्यवाद *******शब्द शृंगार
No comments:
Post a Comment