आदर्श मुल असण्यासाठी आदर्श पालक होणे आवश्यक आहे
जग त्यातली लोक काय कसेही असो आपल्या मुलांचे संगोपन आपणच करतो
लहान तरी १० वर्षापर्यंत पालकान जवळ वेळ असतो कि आपले व मुलांचे घनिष्ट
संबंध प्रस्थापित करण्यासाठी करू शकता. पण जन्म झाला कि आईवडिलांना अत्यानंद
होतो
स्वाभाविकच आहे . मग पहिली दोन वर्ष खूप कोड कौतुक ते मुल स्वतंत्र होते
शारीरिक दृष्ट्या त्याला चालता बोलत येते.
मग ते खोड्या काढतात तिथूनच सारे चालू होते आरडे ओरडे मारणे हा एक प्रकार
पालकांमध्ये दुसरा प्रकार म्हणजे
अति लाड काही मागितले ते घेऊन द्यायचे कसेही वागले तरी कौतुकाच करायचे हे
दोन्ही प्रकराची पालक त्यांची मुले सुसंकृत
वाढविण्यात अपयशी ठरतात.
जर आयुष्यात पालकांनी संयम ठेवून कुठलाही अतिरेक न करता आणि मनुष्य स्वभाव
विचारात घेऊन आणि आपले मुल आपल्या
इच्छा आकांक्षा पूर्ण करण्या आलेली नाही हे जर विचारात घेतले तर त्यांच्या
किशोर वयात ते हात बाहेर जात नाही. मुलांशी नेहमी बोलणे
आवश्यक आहे शाळेत काय चालू आहे कोण मित्र आहेत काय गंमत झाली हे एकूण त्यावर
रागने प्रतिक्रिया देऊ नये नाही तर ते मुल कधीच
आपल्याशी बोलत नाही. त्या एवजी एक आठवड्याने जे आपल्यास नाही आवडले ते तुझ्या
भविष्यसाठी हानिकारक आहे हे शांत शब्दात सांगावे.
आपण जर मुलांशी मान ठेवून बोललो कि मुले उलट उत्तर देत नाही. आपले प्रेम आणि
संस्काराचा पगडा पक्का पाहिजे. मुले चांगली निघतात .
आईवदिलाच्या असयामी स्वभावाने पण खटके उडतात . बदलत्या काळाप्रमाणे पालकांना
बदल्याची गरज नाही पण त्यांच्या मुलांना काळा प्रमाणे
थोडे नक्कीच बदलावे लागेल होणारे चांगले बदल पालकांनी पण स्वीकारायला हरकत नाही पण वाईट ह्यासाठी
मुलांशी सतत बोलणे अवश्य आहे
बोलणे म्हणजे रागावणे नाही किंवा तगदा लावणे नाही तर बसून निट समजावून होणारे
दुष्परिणाम सांगावे.
मुला वाढवताना सुरवातीपासून त्याला जर
सागितले कि तुला तू जे मार्क ह्यावेळला घेतलेस त्यापेक्षा पुढच्या परीक्षेत थोडे
जास्त घेण्याचा प्रयन्त कर. दुसर्या
मुलाचे नाव घेऊन सागितले तर स्पर्धा तुम्हीच शिकवताय असे होते. स्वतःशीच स्पर्धा करायला शिकवायची त्यामुळे
मुलांना नुनागंड येत नाही व त्याचा आत्मविश्वास वाढण्यास मदत होते .आदर्श मुल
असण्यासाठी आदर्श पालक होणे आवश्यक आहे
धन्यवाद
!!!!! लक्ष्मी देसाई