मला नाही वाटत
रामार्थीकर बाईना दुसऱ्या स्त्रियांबद्दल विशेष समजले आहे मनु
स्म्रीतीच्या मुल्यांवर जगणे हे जर प्रमाण ठरवत असतील तर जाती प्रथाही पाळा. जाती
प्रथे साठी तुम्हाला परंपरा वादी व्यवस्था नको पण स्त्रीयासाठी हवी का ? हा एकच प्रश्न मी नेहमी
विचारते पण उत्तर मिळत नाही .
आपल्या येथे पूर्वापार पासून पित्रुसत्तक
पद्धती आहे. त्यामुळे स्त्रियांना समजत दुय्यम स्थान आहे. आज बऱ्याच स्त्रिया पुढारलेल्या आहेत पण संसार करण्यात
मागील काळातील स्त्रियांप्रमाणे तितक्या सक्षम नाही. बरोबर आहे कारण आपण ज्या
कामात लहानपणा पासून तरबेज होते ते काम आपल्याला उत्कृष्ठ करता येते. आज मुलींच्या
आत्मनिरभरतेवर भर दिल्या जातो आईवडीलच त्याला दुजोरा देतात. पण जेव्हा स्त्री
आत्मनिर्भर होणार म्हजे विचाराने स्वतंत्र होणार हा बदल मुलींच्या संस्कारात झाल
पण मुलाल वाढवताना जुन्याक पद्दतीने वाढवले जाते. बदलत्या काळाप्रमाणे तरुण
मुलेमुली नवीन विचाराने जगते पण जुन्या पिढी ही प्रतिगामी विचाराने जगते त्यामुळे
समाजात आज घरातील तणाव जास्त वाढला आहे.
आपल्या देशात कुटुंब पद्धती ही नवि व जुनीपिढी एकमेकांवर आधारित आहे. पण हे मागील
शतका प्रमाणे ठीक होते आज काळ बदलला आहे स्त्री व पुरुष दोघानांही प्रगती करायची
आहे त्यांना आपला देश प्रगत झाला पाहिजे असे वाटते अगदी बरोबरच आहे पण जेव्हा
तुम्हाला प्रगत व्हायचे आहे पण त्यासाठी जो जुन्यापिढीला त्याग करावा लागतो आहे तो
सहन करण्याची ताकत त्यांच्यात नाही म्हनुनच गेले ६६ वर्षे लागली आज जो बदल घडला
आहे त्याला . तुम्हाला तुमच्या देशाची आर्थिक परिस्थिती झपाट्याने बदलावी असे
वाटते पण परंपरावादी प्रतिगामी विचारसरणी तेव्हढ्या झपाट्याने बदलत नाही म्हणून हे असे कौटूबिक आणि
भावनिक प्रश्नांना तोडगे निघात नाही . आजवर स्त्रिया घराची जवाबदारी घ्यायच्या
त्यामुळे एकत्र कुटुंब पद्धती होती आज त्या कामावर जातात त्यामुळे विभक्त कुटुंब
पद्धती आली . का पुरुषांवर कुठलीच जवाबदारी नाही स्वतःचे मुले , आई वडिलांचे पण आपल्या
पत्नीच्या भरोशावर कराचे मुख्य आई वडिलपण मनाने दुर्बल व स्वार्थी आहेत आपल्या
मुलांवर प्रेम करावे पण तो आयुष्यभर आपल्या जवळ राहावा त्यान सेवा करावी ह्या
काळाप्रमाणे अपेक्षा करणे चुकीचे ज्यांची मुले दुसऱ्या देशात राहतात त्यांचे
प्रश्न तर खूप कठीण आहेत. सेवा करण्याबाबत आक्षेप नाही पण प्रत्येक गोष्टीत भावनिक
होऊनही चालत नाही.सुना नौकरी करता त्या घरात तितकेसे करु शकत नाही मग भांडणे
केल्याने प्रश्न सुटणार आहेत का ? नाही भांडल्याने मने दुरावतात मग वैताग नको म्हणून आई वडिलाना वृद्धाश्रमात
नेउन ठेवतात म्हतारी लोक जर आजारी असतील तर त्यांना कोणी तरी सतत लक्ष्य
ठेवण्यासाठी पाहिजे बरोबरच आहे त्यांची सोय करणे हि मुलांची जवाबदारी आहे पण जर ते
घरी बसले तर औषध पाण्याचा खर्च कुठून येईल . जर अश्या संस्था ज्या म्हाताऱ्या
लोकांची काळजी घेत असतील तर वावगे काय ? हा काळा प्रमाणे होणारा बदल आपल्याला मान्य करावाच लागणार आहे . ह्याशिवाय
दुसरा पर्याय नाही .
आता सुना
मुलांचेही वागणे बघू आज ही पिढी उच्च शिक्षित आहे पण ह्यांना तितकीशी
विचारांची प्रगल्भता नाही त्यात चूक आई वडिलांची आहे मुलांसाठी
कर्तव्य करणे ठीक पण
त्यांना पगु करणे योग्य नाही आपल्या येथे मुले मोठी झाल्यावरही त्यांच्यासमोर आयते
ताट वाढल्या जाते मुलगा असेल तर आयुश्याभर मुलगी असेल तर १२ वर्ष्यापर्यंत साधारण
हा भेद कायमच होत आला आहे मुलाला घरात काम कराल फार थोड्या घरांमध्ये शिकवतात .
दोन्हीही लिंगांवर पारंपारिक गोष्टीनाचा पगडा मोठी होतात लग्न करतात पण मग
नात्याचा समतोल राहत नाही नवर्याला वाटते बायकोनेच येउन स्वैपाक केला पाहिजे आणि
मुलीला वाटते मीच का करू आता प्रश्न स्त्री अहंकार किंवा पुरुष अहंकाराचा आहे पण
भूक दोघानाही लागते जो आधी येईन त्याने करा इतके सोपे आहे पण अहंकार परंपरा सुटत
नाही आपल्याला नक्की काय पाहिजे हेच कळले नाही. नंतर मुले होतात एकतर मुलानाचे
संगोपन करता येत नाही कुणाच्या तरी आईवडिलांची सतत मदत लागते कारण तुम्हाला तुमचे
करिअर करायचे आहे .मुलाला पाळणा घरात ठेवायचे नाही मग आईवडील किंवा सासू
सासर्यांनी नातू सांभाळायचे साध विचार आहे म्हातारी लोक त्यांनी आपले सारे
आयुष्यभर कष्ट घेतालेली असतात नुकताच आपला संसार आटपून मोकळी झाली तर आता नातवांचे करायचे कधी म्हाताऱ्या
आईवडिलांचा विचार केला का ? अन मग गरज संपली कि वृद्धाश्रमात नेउन ठेवायचे . किती वाईट परिस्थिती किती
स्वार्थी आणि आपलपोटी मुले ही . ह्यात चूक दोन्हीबाजुनी आहे आईवडील प्रेमापोटी
दुबळे आणि मुले निश्क्रियतेने दुबळे . आपल्या येथील आजच्या स्त्रीला पाश्चिमात्य
स्त्री सारखे स्वातंत्र्या पाहिजे पण त्या स्त्रीयासारखे शारीरिक व मानसिक सबलता
आजूनही आलेली नाही किंवा ती मिळवायची नाही. पाश्चात्य देशात कोणी कोणावर निर्भर
राहत नाही जर कुटुंब जवळ असेल तर मदत करते नाही तर पश्च्तात्या स्त्री स्वतःचे
बाळातपण व मुलांचे संगोपन स्वतः करते . त्यांच्या इथे घराकामालाही माणसे मिळत
नाही. आहे का आपल्या येथील स्त्रियांची येव्हढे कष्ट व हिमतीने जगायची तयारी ? आपण सारेच त्या मानाने
पंगु आहोत . प्रतिगामी विचारसरणीने जगायचे
की पुरोगामी हेच ठरवता येत नाही . धर्म आणि परंपरांनी आपण इतके आंधळे आहोत की
माणुसकीला आपल्या आयुष्यात थाराच नाही एक व्यक्ती कायम दुसऱ्या कुणावर अन्याय करत
असतो आपण प्रत्येक गोष्ट विकोपाला नेते एकतर सासू सुनेवर किंवा नवरा बायकोवर उलट
सून सासूवर अत्याचार करते किंवा पत्नी पतीवर जोर टाकत असते आपल्याला दुवा शोधत
येताच नाही हे सिद्ध होते . प्रत्येक नात्यात समतोल असावा लागतो तो राहातच नाही .
वागण्यातही आढळत नाही . येव्हाढेच म्हणायचे रामार्थीकर
बाई जवळ ह्यावर काही उपाय नाही काळाप्रमाणे आज कुठल्याही स्त्रीला
मनुस्म्रीती प्रमाणे जगायचे नाही. आपण ती जीवन पद्धती सोडण्यास कारणे होती त्याचे
वाईट परिणाम भोगले आहेत. आपण कुठल्या काल्पनिक आदर्श कौटुंबिक समाजाची स्वप्ने
बघतो जे कधी वास्तवात नव्हते १९व्या शतका पर्यंत मनुस्म्रीती प्रमाणे जगलो मला
सांगा त्या काळात विधवांना मुले झाली ,कुमारी माताही झाल्या , वेश्याव्यवसाय होते , नायकिनी होत्या तमाशाचे फड होते लोक गांजा अफूचा नशा करत होते नशा स्त्रीपुरुष
आधीपासूनच करतात पण १९व्या शतकापर्यंत
एकाच लिंगावर अन्याय व्हायचा त्यामुळे आपण मनूच्या विरोधात जाऊन बदल घडवले
मानव जमात जो पर्यंत ह्या पृथ्वी तलावर आहे तो पर्यंत चुका होणार आणि आपल्याला नवे
उपाय शोधून जीवन जगावे लागणार आहे. हे सत्य नाकारून चालणारच नाही.
आभार
लक्ष्मी देसाई
मॅडम ...तुम्ही "मनु " वाचलाय?
ReplyDeleteHo
Delete